भुसावळ : तालुक्यताील शिंदी येथील 22 वर्षीय युवतीचा रविवारी दुसरा विवाह विचवा (ता.बोदवड) येथील युवकाशी रविवारी झाला व त्यानंतर माहेरी आल्यावर विवाहितेने राहत्या घरात मंगळवारी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पूजा रवींद्र चौधरी (22, शिंदी, ता.भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
माहेरी येताच केले विष प्राशन
पूजा चौधरी यांचा रविवारी बोदवड तालुक्यातील विचवा येथील मिलन पाटील या युवकाशी विवाह झाला. रविवारी विवाह झाल्यावर पूजा मिलन पाटील या सोमवारी शिंदी येथे माहेरी आल्या मात्र बुधवारी पूजा हिने काहीतरी विषारी औषध सेवन केले. तिला त्रास जाणवू लागल्याने तिला तत्काळ भुसावळातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार करून तब्येत बरी झाल्याने तिला पुन्हा घरी नेण्यात आले मात्र पुन्हा तब्येत खराब झाल्याने जळगाव येथे बुधवारी उपचारासाठी नेण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असतांनाच पूजा हिचा मृत्यू झाला.
आजीने केला होता सांभाळ
पूजाच्या वडिलांचा 13 वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. आई ही माहेरी राहते, त्यामुळे पूजा तिची एक बहिण व भाऊ यांचा सांभाळ तिच्या आजीने केला. पूजा हीने केलेल्या आत्महत्येचे कारण मात्र काही कळू शकले नाही. शिंदी येथे गुरूवारी दुपारी एक वाजता मयत पूजावर अंत्यसंस्कार करण्यात आले.