मलकापूर : मलकापूर हद्दीतील लक्ष्मी कॉलनीजवळ एका नववीत शिकणा- याने मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. पायल लोंढे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेतलेली असून अधिक माहिती घेत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलकापूर येथील गोकाक पाणीपुरवठा परिसरातील लक्ष्मी काॅलनीत एका घरात नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. आज शुक्रवारी दि. 28 रोजी सकाळी ही घटना समोर आली आहे. पायलचे आई व आजी – अजोबा काल लग्नाला बाहेरगावी गेलेले होते, त्यानंतर आज सकाळी लग्नाहून आल्यानंतर आजोबांना पायलने गळफास घेतल्याचे दिसून आले. राहत्या घरात कोणी नसताना पायलने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हे देखील वाचा :
शिरसोलीच्या तरुणाने घेतला गळफास
जनधन खाते: बँक खाते उघडल्यावर मिळतील 10,000 रुपये, केंद्र सरकार देतेय मोठा फायदा, जाणून घ्या कसे?
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
…म्हणून गिरीश महाजनांसह 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पायल हिचे आई-वडिल मजूरीचे काम करतात. तसेच लोंढे कुटुबिंय हे परजिल्ह्यातील असल्याचे समजत आहे. सध्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पायल हिने आत्महत्या केल्याचे समजत आहे.