क्राईम ब्रँच पोलिसांनी या रॅकेटचा डाव उधळून लावतांना कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे, ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असल्याची माहिती मिळत आहे.या आरोपींकडून ७ मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
धक्कादायक संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या युवकाचा नोटा छापण्याचा कारखाना
संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. धक्कादायक म्हणजे, यापूर्वीदेखील बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देखील झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. कारागृहातून सुटल्यावर देखील आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता.
पोलिसांचा कारखान्यावरच छापा
मुकुंदवाडी येथे भाड्याच्या खोलीत समरान आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून सर्व आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश होता. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळावरुन कम्प्युटर, प्रिंटर, कागद असा ऐवजही ताब्यात घेतला आहेत.