पुणे : सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कंपनी म्हणून Google कडे पाहिले जाते. आता गूगलकडून भारतात आपल्या कंपनीची (Google India Jobs) व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुगल आता लवकरच पुण्यामध्ये आपलं ऑफिस सूरू करणार आहे. याबाबत सोमवारी गुगलने जारी केलं आहे.
गुगलच्या माहितीनूसार, जे प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करेल.
या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे, ही सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करेल. म्हणून ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड अथवा याबाबत शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत गुगलने पुण्यातही आपलं क्लाउडबाबत ऑफिस सुरु करणार आहे. त्यामुळे राज्यातील आणि देशभरातील अनेक तरुण-तरुणींना, फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी नोकरीची दारे खुली असणार आहेत. भारतातील क्लाउड इंजिनीअरिंगचे VP अनिल भन्साळी (Anil Bhansali) म्हणाले, ”पुण्यात कार्यालय झाल्यानंतर फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे.
एक IT हब म्हणून, पुण्यातील आमचा विस्तार आम्हाला उच्च प्रतिभेचा वापर करण्यास सक्षम करेल कारण आम्ही आमच्या वाढत्या ग्राहकांसाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा विकसित करत आहोत.”
तसेच, ”ग्राहक त्यांचे विश्वासू भागीदार म्हणून Google क्लाउडकडे वळतील असे उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये, कंपनीने आईबीएमचे वरिष्ठ कार्यकारी सुब्रम नटराजन यांची भारतातील कामकाजासाठी ग्राहक अभियांत्रिकी संचालक म्हणून नियुक्ती केली.