पुणे : घरगुती भांडणातून पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये खाली ढकलले. सुदैवाने यात पत्नी बचावली. मात्र, तिच्या मणक्याला जबर मार लागला आहे.
शैला दहिरे (२५, रा.कोंढवा बुद्रुक, पुणे) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नितीन दहिरे (३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. नितीन हा पंेटिंगची कामे करतो. त्याने इतर मित्र व नातेवाइकांसह पाच ते सहा गुंठे जागा काकडे वस्ती येथे घेतली. सर्वांनी कंत्राटदाराला काम देत सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सध्या आरोपी पत्नीसह राहतो.
त्यांच्या इमारतीच्या लाइट फिटिंगचे काम आठ दिवसांपूर्वी झाले होते. हे काम त्याने सांगितल्याप्रमाणे झाले नाही. याबद्दल पत्नीने सुपरवायजरला जाब का विचारला नाही, असा आक्षेप घेत तो पत्नीशी भांडला. यानंतर दारू पिऊन त्याने पत्नीला मारहाण करत चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलले. यात तिला जबर मार लागला असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.