जळगाव : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी जोरदार वाऱ्यांनंतर कमाल तापमानाचा पारा खाली घसरला. सोमवारी सकाळीही हा परिणाम कायम होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग येथे किमान तापमान खाली उतरले. मुंबईमध्ये किमान तापमानात अवघ्या २४ तासांमध्ये ६ अंशांचा फरक नोंदला गेला. तर राज्यात नाशिक, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव येथे तापमान १० अंशांपेक्षा कमी होते.
जळगाव जिल्ह्यात साेमवारी किमान तापमान ९.२ अंशांवर तर कमाल तापमान २८ अंशांवर हाेते. वाऱ्याचा वेग ताशी १० किमीपर्यंत हाेता. रात्री अतिशय कडाक्याची थंडी हाेती. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात थंडीची लाट कायम असेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
दाट धुके, ५१ टक्के ढगाळ वातावरण, ताशी २० किलाेमीटर वेगाने वाहणारे वारे यामुळे रविवारी दिवसभर माेठ्या प्रमाणात गारठा हाेता. साेमवारी दक्षिण-पश्चिमेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक हाेती. साेमवारी वातावारण निरभ्र हाेते. त्यामुळे दृश्यमानता १६ किमीपर्यत हाेती. साेमवारी किमान तापमान ९.२ अंशांवर हाेते. येत्या गुरुवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
हे पण वाचा :
नाना पाटेकरांचा अजितदादा बद्दलचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय
वर्ध्यात भाजप आमदाराच्या मुलासह 7 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
ओमिक्रॉन दरम्यान ‘या’ रसांचे सेवन करा, आरोग्य राहील चांगले
‘या’ योजनेत तुम्हाला मासिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल, जाणून घ्या कसे?
मध्य महाराष्ट्रात इतर ठिकाणी, विदर्भ, मराठवाडा येथेही कमाल आणि किमान दोन्ही तापमानाचा पारा उतरला होता. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात मंगळवार ते गुरुवारदरम्यान थंडीची लाट अधिक जाणवण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
रविवारी जोरदार वाऱ्यांनंतर कमाल तापमानाचा पारा खाली घसरला. सोमवारी सकाळीही हा परिणाम कायम होता.