मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या रामवाडी भागात का 21 वर्षांच्या तरुणीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान, मृत्यूआधी तिनं लिहिलेल्या सुसाईड नोटनं अनेकांना धक्का दिला आहे. जान्हवी विजय चव्हाण असे मृत तरुणीचे नाव आहे.
विजय चव्हाण हे जोगेश्वरीतल्या रामवाडीत राहातात. पालिकेच्या जल विभागात फिटर म्हणून काम करणारे विजय चव्हाण यांच्या पत्नीचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न लावून देण्यात आलं होतं. मोठा मुलगा लग्नानंतर विरारला राहत होता. दरम्यान, त्यांना एक मुलगीही होती. मोठ्या मुलीच्या लग्नानंतर मुलगी घरात बराचवेळ एकटीच असायची. दरम्यान, पत्नीच्या निधनानंतर आता मुलीनंही आत्महत्या केल्यानं चव्हाण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा :
वर्ध्यात भाजप आमदाराच्या मुलासह 7 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
ओमिक्रॉन दरम्यान ‘या’ रसांचे सेवन करा, आरोग्य राहील चांगले
‘या’ योजनेत तुम्हाला मासिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल, जाणून घ्या कसे?
फेब्रुवारीत ‘इतके’ दिवस बँका बंद राहतील, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पहा
दरम्यान, मृत्यूआधी तिनं लिहिलेल्या सुसाईड नोटनं अनेकांना धक्का दिला आहे. आपला मोबाईलचा पासवर्ड तिनं सुसाईड नोटमध्ये सांगितला असून तिच्या आत्महत्येची नोट वाचून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव जान्हवी विजय चव्हाण असं आहे. ‘पप्पा यात सर्व पुरावे आहेत, त्याला सोडू नका’ असं जान्हवीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. सोबत तिनं आपल्या मोबाईलचा पासवर्ड दिली आहे. दरम्यान, या घटनेनं जोगेश्वरीतील रामवाडी परिसर हादरुन गेला आहे. एका तरुणालाही या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलंय.