परभणी : राज्यातील वाढते रस्ते अपघात सध्या चिंतेचा विषय ठरत असून अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीय. अशात जिंतूर शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला. यात कॉलेजमध्ये जात असताना तिघा भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ तर एका चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानं मृत भावंडांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे सुद्धा वाचा :
जळगावची शिवांगी काळेला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
NCL मध्ये मोठी पदभरती, 10वी उत्तीर्णांना परीक्षेशिवाय मिळेल नोकरी
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
शाळा आणि महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली आहे. मालेगाव येथील अभिषेक काशिनाथ म्हेत्रे 18 वर्ष, योगेश काशिनाथ म्हेत्रे 15 वर्ष, रामप्रसाद विश्वनाथ 20 वर्ष या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. हे तिघेही जिंतूर येथील कॉलेजला जाण्यासाठी बाईकवरुन येत होते. त्या दरम्यान आकोली शिवारामध्ये आल्यावर समोरून येणाऱ्या ट्रकचा आणि त्यांच्या बाईकचा अपघात झाला. या अपघातात तिघाही भावंडाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना समोर आली आहे. जागीच या तिघांचाही अपघातात जीव गेला.