बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी म्हाडा ने उपलब्ध केली आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर २०२१ रोजी विविध पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबईने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार www.mhada.gov.in वर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी करा अर्ज….
कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता(आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ रिक्त जागा उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची तारीख – १७ सप्टेंबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२१
कोणत्या पदासाठी किती जागा…. जाणून घ्या…
कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर] – १३
उप अभियंता [आर्किटेक्चर] – १३
प्रशासकीय अधिकारी – ०२
सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर] – ३०
सहाय्यक कायदेशीर सल्लागार – ०२
कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर] – ११९
कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक – ०६
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – ४४
सहाय्यक – १८
वरिष्ठ लिपिक – ७३
कनिष्ठ लिपिक – २०७
लघुलेखक लेखक – २०
सर्वेक्षक – ११
ट्रेसर – ०७
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी १२ वी पास, पदवी, बीई/ बीटेक (संबंधित विषय) असणे आवश्यक आहे. उमेदवार वेबसाईटवर दिलेल्या अधिसूचनेमध्ये तपशीलवार शैक्षणिक पात्रता तपासू शकतात.
वयोमर्यादा
कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर] – १८ ते ४० वर्षे
उप अभियंता [आर्किटेक्चर]- १८ ते ३८ वर्षे
प्रशासकीय अधिकारी – १९ ते ३८ वर्षे
सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर] – १८ ते ३८ वर्षे
सहाय्यक कायदेशीर सल्लागार – १८ ते ३८ वर्षे
कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर] – १८ ते ३८ वर्षे
कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक- १९ ते ३८ वर्षे
आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक – १८ ते ३८ वर्षे
सहाय्यक – १८ ते ३८ वर्षे
वरिष्ठ लिपिक – १९ ते ३८ वर्षे
कनिष्ठ लिपिक – १९ ते ३८ वर्षे
शॉर्टहँड लेखक – १८ ते ३८ वर्षे
सर्वेक्षक – १८ ते ३८ वर्षे
ट्रेसर – १८ ते ३८ वर्षे