मुक्ताईनग,(प्रतिनिधी)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवकांनी खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थिती मध्ये भाजपात प्रवेश घेतला आहे.
तालुक्यातील मेळसांगावे व पंचाने येथील असंख्य युवकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी ट्विट करून दिली आहे.
तसेच यावेळी भाजयुमो कार्यकारिणीच्या तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देऊन नव्याने निवड करण्यात आली.
यावेळी भाजपा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, भाजयुमो तालुका सरचिटणीस हर्षद (मयुर) महाजन व उमेश रमेश भिंगरे, तालुका सोशल मीडिया संयोजक कल्पेश रामदास पाटिल व तालुका कोशाध्यक्ष आकाश संतोष ठाकरे व भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगावे व पंचाने येथील असंख्य युवकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भाजपा मध्ये माझ्या हस्ते प्रवेश केला. तसेच यावेळी भाजयुमो कार्यकारिणीच्या तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देऊन नव्याने निवड करण्यात आली. pic.twitter.com/1TSqPHswUF
— Raksha Khadse (@khadseraksha) September 17, 2021