बीड,दि.५ – करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत राज्यात खळबळ उडवली असतांना त्या आज दुपारी परळीत दाखल झाल्या व त्यानंतर त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.काही महिलांकडून त्यांना धक्काबुक्की झाल्याने गोंधळ निर्माण होता.
दरम्यान करुणा मुंडे यांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवले असतांना त्यांच्या वाहणाची झडती पोलिसांनी घेतली असता गावठी कट्टा आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली.पोलीस ठाण्याबाहेर धनंजय मुंडे यांच्या कट्टर समर्थकांनी प्रचंड गर्दी करत करुणा मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.पुढील तपास पोलीस करत असून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.