जळगाव,(प्रतिनिधी)- शामनगर येथे अवैध धंदे चालवतात त्यांच्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार शुभम विनोद कोचुरे यांनी केल्यामुळे १० ते १५ जणांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश करून विवेकानंद नगरातील घरातील सामानांची तोडफोडकरून कोचुरे कुटुंबियातील आईला आणि मुलाला (शुभम) यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्यावर दत्तू कोळी, विकी कोळी व भरत सपकाळे या सर्वांनी तिथून पळ काढला असून याप्रकारणी पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली असती तर ही घटना कदाचित घडली नसती, कोचूरे कुटुंबियांना बेदम मारहाण करत शुभम यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती पराग कोचुरे यांनी आज दि.10 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर माहिती अशी कि, शामनगर येथे शुभम (पुष्पक) विनोद कोचुरे ह्यांचे कुक्कुट पालन केंद्र आहे. त्यांच्या समोरील एका घरात दत्तू कोळी, विकी कोळी व भरत सपकाळे हे पत्ते, सटटा, देशी दारू व गांजा विक्री चे अवैध धंदे चालवतात तसेच तिथे येणारे लोक त्यांच्या पोल्ट्री फॉर्म समोरच दारू पियुन त्रास देत असल्याची तक्रार दिली होती. त्यांच्या राग आल्यामुळे विवेकानंद नगरातील घरात जाऊन शुभम कोचुरे यांना दत्तू कोळी, विकी कोळी व भरत सपकाळे व १५ साथीदार हे त्याच्या घरी जाऊन दोघांना मारहाण करत घरातील वस्तूची तोडफोड केली तसेच घरात असलेले दागीने व पैसे लुटले व घरात एकट्या असलेल्या त्याच्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आला तसेच शुभमला कोयता, लोखंडी रॉड , लाकडी काठ्या घेऊन मारण्यात आल्याचे पराग कोचूरे यांनी सांगितलं. शुभमला सुयोग्य क्रिटिकल सेंटर येथे ऍडमिट केले असून अद्याप पर्यंत ही तो शुद्धीत आला नसल्याची माहिती पराग कोचुरे यांनी दिली. तरी याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पराग कोचूरे यांनी केली आहे.

