Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.सुवर्णा दिलीप पाटील यांनी लिहलेला सुंदर लेख सुवर्ण जीवन प्रवास…

najarkaid by najarkaid
March 10, 2021
in आरोग्य
0
डॉ.सुवर्णा दिलीप पाटील यांनी लिहलेला सुंदर लेख सुवर्ण जीवन प्रवास…
ADVERTISEMENT

Spread the love

NYPAH थेरपी
सुवर्ण जीवन प्रवास… भाग १

लेखिका डॉ.सुवर्णा दिलीप पाटील…

(संकलन -मंत्रालय प्रतिनिधी चेतन महाजन)

योग म्हणजे जोडणे. आपली ताकद ही ब्रह्मांडाच्या ताकदी सोबत जोडणे म्हणजेच योग साध्य करणे होय.
‘जे पिंडी ते ब्रम्हांडी, जे ब्रम्हांडी ते पिंडी’. हे ब्रम्हांड ज्या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे त्याच पंचमहाभूतांपासून आपण बनलो आहोत.
आयुर्वेदात सांगितले आहे की तीन प्रकारच्या प्रकृती असतात वात, पित्त, आणि कफ. यांचा समतोल म्हणजेच आरोग्य होय. बालपणी कफाचा प्रभाव जास्त असतो. तारुण्यात पित्ताचा आणि वार्धक्यात वाताचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे आजारांचे शरीरात आगमन होते. त्यासाठीच आहार-विहार, स्वभाव यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे आणि हे नियंत्रण साध्य होते योगा मधून.
पतंजलि ऋषींनी योगाची व्याख्या चित्त वृत्ति निरोध अशी केली आहे. म्हणजे योगाभ्यासातून मनावर ताबा मिळविणे.
जेथे स्थिर मन तेथे स्थिर काया.
योगाचा सर्वात प्रथम संदर्भ वेदांमध्ये आला. त्यात योगाबद्दल सांगितले पण त्यात आसने नव्हती. तद्नंतर भगवान श्रीकृष्णांनी योगाबद्दल भगवद्गीतेत सांगितले.
“युक्तहारविहारस्य, युक्तचेष्टस्य कर्मसु|
युक्तस्वप्नावबोधस्य योगाभवति दु:खहार||”
अर्थात ज्याचा आहार, विहार, विचार, रोजची कामे, कर्तव्य इत्यादी योग्य आहेत. त्यालाच दुःख हारक योग लाभदायक आहे.
योग म्हणजे फक्त आसने नव्हे तर ती एक जीवनपद्धती आहे जसे राजयोग, कर्मयोग.
या गतिमान जीवन पद्धतीमध्ये आपण आपले शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्य हरवून बसलो. त्यामुळे बीपी, डायबेटीस, थायरॉईड, डिप्रेशन अशा कितीतरी आजारांना आमंत्रित केले.
परंतु सगळ्या जगाला वरदान ठरणारी अतिप्राचीन जीवन पद्धती म्हणजे योग होय. ही देणगी भारताने जगाला दिलेली आहे.

योगा एकसंधता या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. जसा आपल्या शरीराचा एखादी भाग शरीरापासून विलग केला गेला तर तो भाग जिवंत राहू शकत नाही. त्याच प्रमाणे माणूसही भावना, निसर्ग, आप्तस्वकीय यांच्यापासून जास्त काळ वेगळा आणि आनंदी राहू शकत नाही. म्हणजे हा निसर्ग, जीवन जगण्याची आदर्श पद्धत, आप्तस्वकीयांची सोबत. हे सर्व एकत्र आले तरच माणसाचे जीवन हे आनंदी होते.

कटोपनिषदामध्ये सांगितले आहे की जेव्हा सर्व इंद्रिय ताब्यात असतील, मन स्थिर असेल आणि बुद्धी विचाराधीन असते त्यावेळेस योगाच्या सर्वोच्च बिंदूला आपण पोहोचू शकतो.
प्रत्येकालाच आनंदी आणि निरोगी आयुष्य जगायला आवडते. परंतु तसे होत नाही कारण आपण स्वतःला बऱ्याच जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून ठेवले आहे. परंतु अष्टभुजेप्रमाणे या जबाबदाऱ्या लिलया पेलत एक निरोगी आयुष्य आपण जगू शकतो आणि तेच या सदरातून आपण सुरु करीत आहोत.

प्रत्येक भागानंतर एक आचरण दिलेले आहे. ते आचरण आपण हा भाग वाचल्यानंतर त्या दिवसापासून सुरू करायचे.
एक महिन्यानंतर झालेला बदल नक्की कळवायचा.

आचरण पहिले—झोपण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुऊनच झोपावे.
रात्री झोपताना दिवसभराची जळमटे फेकून निर्मळ मनाने झोपणे. झोपताना मधुर संगीत ऐकावे.

क्रमशः

साहित्यसंपदा
सुवर्णजीवनप्रवास

डॉ.सुवर्णा पाटील,भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही

Next Post

रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचा बनावट अहवाल देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
जलसंपदा विभागातील लॉजिंग आणि बोर्डिंगची खोटी देयके सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचा बनावट अहवाल देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us