Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

najarkaid by najarkaid
May 30, 2024
in Uncategorized
0
ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : वकिलीच्या माध्यमातून नाशिक विभागासह राज्यातील हजारो शिक्षकांना न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. महेंद्र भावसार यांना नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) उमेदवारी मिळू शकते अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ॲड. भावसार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मागितलेली असल्याचे बोलले जात आहे.

पक्षश्रेष्ठींचा सकारात्मक प्रतिसाद : शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेमध्ये शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त करीत ॲड. महेंद्र भावसार यांनी याआधीच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती. तसेच परवा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. ॲड. महेंद्र भावसार यांनी आतापर्यंत शिक्षकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ॲड. भावसार यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळेल मानले जात आहे. ॲड. महेंद्र भावसार यांचे सुपुत्र सारांश भावसार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या राज्यात काम करीत आहेत. त्यामुळे ॲड. भावसार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद : आपल्या उमेदवारीला नाशिक विभागातील शिक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा ॲड. महेंद्र भावसार यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी शिक्षकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर येथील शिक्षकांशी चर्चा करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

एडवोकेट महिंद्रा भावसार यांची भूमिका : शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो? शिक्षकाची काही चूक नसतानाही त्याना कसे कायदेशीर बाबींमध्ये अडकविले जाते? याबाबत ॲड. भावसार यांचा पूर्ण अभ्यास असून, अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. कायद्यात कोणत्या त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल या विषयावर ॲड. भावसार यांनी अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला असून, तो शासनाला सादर केला आहे. परंतु त्यानंतरही या दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ॲड. भावसार म्हणतात, वकिली क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकांसाठी न्याय मिळविण्याचे कामकाज ३२ वर्षे केल्यानंतर असे निदर्शनास येते की, मूलभूत कायद्यातच काही बदल आवश्यक आहेत. तसेच कायदा बदलण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नाही तर ते संसदेचे अथवा विधानभवनाचे आहे. म्हणूनच शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधानभवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे, या उद्देशाने शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय आहे. यासाठीच राजकारणात प्रवेश करीत असल्याचे ॲड. महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बॉयफ्रेंडच्या मदतीने जन्मदात्या बापाचा व सख्या भावाचा खून केला ; मृतदेह ‘फ्रिज’ मध्ये, धारदार शस्राने वार…

Next Post

पाण्याची बाटली घेवून येते सांगून गेली आणि बेपत्ता झाली ; जळगाव बसस्टॅण्ड येथील घटना

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Next Post
पाण्याची बाटली घेवून येते सांगून गेली आणि बेपत्ता झाली ; जळगाव बसस्टॅण्ड येथील घटना

पाण्याची बाटली घेवून येते सांगून गेली आणि बेपत्ता झाली ; जळगाव बसस्टॅण्ड येथील घटना

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us