Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१ मे पासून होणार कपाशीच्या बियाणांची विक्री !

najarkaid by najarkaid
April 21, 2020
in जळगाव
0
१ मे पासून होणार कपाशीच्या बियाणांची विक्री !
ADVERTISEMENT

Spread the love

  • १ मे पासून होणार कपाशीच्या बियाणांची विक्री
  • बियाणांचा तुटवडा भासू देणार नाही- पालकमंत्री गुलाबराव पाटील
  • उन्हाळी लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना होणार लाभ

जळगाव, दि.२१ : -कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने १ मे पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे उन्हाळी लागवड करणार्‍या कापूस उत्पादकांना लाभ होणार आहे.

शेतकर्‍यांनी केली होती मागणी

याबाबत वृत्त असे की, १४ फेबु्वारी रोजी झालेल्या कापूस उत्पादकांच्या बैठकीत यंदा २५ मे २०२० पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या आपत्तीमुळे सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने यंदा बियाणे पाकिटांची विक्री ही आधीपासून करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हा प्रश्‍न सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुसार ना. गुलाबराव पाटील यांनी याबाबत कृषी मंत्र्यांशी चर्चा करून १ मे पासून कापूस बियाणे विक्री करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने ही मागणी मान्य करण्यात आली असून यंदा १ मे पासून शेतकर्‍यांसाठी कपाशीचे बियाणे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कृषि आयुक्त पुणे यांनी कळविले आहे.

*शेतकर्‍यांची फसवणूक टळणार*

जळगाव जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र खूप मोठे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ५,०७,५८३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यंदा उन्हाळी लागवड होणार असून एकंदरीत कपाशीच्या लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे ५,१०,७५५ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होऊ शकतो. यातील ५,०५,३६४ हे बीटीचे तर ७६९१ हेक्टर हे नॉन-बीटीचे क्षेत्र राहील असा अंदाज आहे. यासाठी २५,५३,७७५ बियाण्यांचे पाकिटे लागणार असून यात २५,१५,३१९ इतके बीटी-२ तर ३८,४५६ नॉन-बीटी बियाण्यांची पाकिटे असतील असा अंदाज आहे. नेहमी प्रमाणे मे अखेरीस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध केल्यास शेतकरी आधीप्रमाणेच अन्य जिल्ह्यांमधून बियाणे खरेदी करतील व यात त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण आधी अनेकदा हे प्रकार घडलेले आहेत. शेतकर्‍यांची ही फसवणूक टाळण्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी प्रयत्न केल्यामुळे आता शेतकर्‍यांना १ मे पासूनच बियाणे उपलब्ध होणार आहे. राज्याच्या कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व कृषी सहसंचालकांना पत्राद्वारे याची माहिती दिली आहे.

काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई- ना. पाटील

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांना यंदा १ मे पासून कपाशीची बियाणे उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना बियाण्यांचा तुटवडा होऊ देणार नसल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली आहे. तर बियाण्यांचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

आसोदा जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us