नागपूर- माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर आहेत. हंसराज अहीर सुखरूप आहेत. वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज सकाळी 8.30 च्या सुमारास हा अपघात झाला. हंसराज अहीर हे चंद्रपूरहून नागपूरला जात होते. वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर हा अपघात झाला. सुरक्षा वाहनाचा चालक गंभीर असल्याचे समजते.