Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ‘इतक्या’ लाखात गंडवल

Editorial Team by Editorial Team
October 27, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | विमा कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याची थाप मारून तिघांची एका ८८ वर्षीय वृद्ध तथा निवृत्त कृषी अधिकाऱ्यास ६१ लाख ७९ हजार ५९३ रुपयांचा गंडा घातला. चार वर्षांत वेगवेगळे आमिष देऊन ही फसवणूक केली आहे. टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी ग्रॅच्युएटी, निवृत्तीसह शेतीच्या उत्पन्नाची रक्कम बचत केली हाेती. तिच्यावर भामट्यांनी डल्ला मारला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिकाराम भोळे यांना दोन मुले व एक मुलगी असून ते मुंबई व पुण्यात वास्तव्याला आहेत. पत्नी सुनंदा यांच्यासह ते विद्युत कॉलनीत राहतात. भोळे हे कृषी विभागातून मार्च १९९२ मध्ये निवृत्त झाले आहेत. २०१७ मध्ये दीपिका शर्मा नावाच्या महिलेने मोबाइलवर भोळे यांच्याशी संपर्क साधून स्टार हेल्थ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे एलआयसी कंपनीकडे १ लाख ९५ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत हवी असल्यास मी सांगेल तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल’ असे सांगून पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो व २४ हजार २७० रुपयांचा धनादेश त्यांच्याकडून पोस्टाने मागवून घेतला. याचप्रमाणे रॅल हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ४ लाख ७५ हजार रुपये एवढी रक्कम बाकी असल्याचे सांगून ४० हजार रुपये उकळले. या महिलेस जानेवारी २०२०पर्यंत भोळे यांनी ४६ लाख ११ हजार ८७५ रुपये दिले होते. यानंतर भोळेंनी पैसे देणे बंद केले व दिलेले आधीचे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. या मुळे महिलेने स्वत:चा फोन बंद करून भोळेंशी संपर्क तोडला. त्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या एका तरुणाने भोळेंना संपर्क केला. आधीचे जमा असलेले पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन या तरुणाने दिले. त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर भोळेंकडून त्याने पुन्हा पैसे मागण्यास सुरुवात केली. विविध ऑफर्स देऊन या तरुणाने देखील १५ लाख ६७ हजार ७१८ रुपये ऑनलाइन पद्धतीने मागवून घेतले.

सायबर पाेलिसांत फिर्याद
तीन जणांनी मिळून भोळे यांची ६१ लाख ७९ हजार ५९३ रुपयांत फसवणूक केली. परतावा तसेच वेळोवेळी दिलेले पैसे परत मागितले असता संबंधितांकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने फसवणुकीची खात्री झाल्यावर भोळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खाद्यतेलाच्या दरावरून केंद्राचे राज्यांना पुन्हा पत्र

Next Post

आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो? जाणून घ्या

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो? जाणून घ्या

आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us