Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो? जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
October 27, 2021
in राष्ट्रीय
0
आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो? जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली :  देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देतात, मात्र केवळ काही हजार विद्यार्थ्यांनाच यश मिळते. भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच निवडले जातात, ज्यांची जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणे आहे. बर्‍याचदा लोकांना आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती आहे आणि इतर कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घ्यायचे असते.

भारतीय पोलीस सेवा (IPS) अंतर्गत निवडलेले अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. त्यांना एसपीपासून (SP – Superintendent of police – सुपरिटेंडंट ऑफ पोलीस – पोलीस अधीक्षक) डीआयजी (DIGP – Deputy Inspector General of Police – डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस – पोलीस उपमहानिरीक्षक), आयजीपी (IGP – Inspector General of Police – इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस – पोलीस महानिरीक्षक) आणि डीजीपीपर्यंत (DGP – Director-General of Police – डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस – पोलीस महासंचालक) बढती मिळते. यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांना कठोर प्रशिक्षण (IPS Officer Training) घ्यावं लागतं.

दरम्यान, IPS ला 7 व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पगार मिळतो. याअंतर्गत त्यांचं किमान मासिक वेतन 56 हजार 100 रुपये आहे. वेतनाव्यतिरिक्त, आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यासह इतर अनेक भत्तेही दिले जातात. डीजीपी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो. त्यांना दरमहा सुमारे 2 लाख 25 हजार रुपये (डीजीपी पगार) मिळतात.

या विशेष सुविधाही आहेत उपलब्ध

आयपीएस अधिकाऱ्यांना घर, वाहन आणि इतर विशेष सुविधा वेगवेगळ्या पे बँडच्या (IPS Officer Pay Band) आधारे दिल्या जातात. त्यांना पदानुसार घरकाम, सुरक्षा रक्षक, वाहनचालक आदी सुविधाही दिल्या जातात. तसंच, वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त दूरध्वनी आणि वीजबिलही सरकार भरतं. आयपीएस अधिकाऱ्यांना देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक रजा (Education Leave) घेण्याची परवानगी आहे. याचा खर्च सरकार उचलतं. निवृत्तीनंतर त्यांना आजीवन पेन्शनही (Pension Scheme) मिळते.

प्रत्येक पदासाठी विशेष वेतन निश्चित केलं आहे

पोलीस उपअधीक्षक – डीएसपी या पदावरील आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP – Additional Superintendent of police) – यांना 67 हजार 700 रुपये पगार मिळतो.

पोलीस अधीक्षक – एसपी या पदाला 78 हजार 800 रुपये पगार मिळतो.

हे वाचा – बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले तब्बल 16 Toothbrush; एक वाईट सोडवण्यासाठी केला भयंकर उपाय!

वरिष्ठ पोलीस अधीक्षक – (SSP – सीनियर सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस) यांचे वेतन 1 लाख 18 हजार 500 रुपये आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक – (DIGP) अधिकाऱ्याला 1 लाख 31 हजार 100 रुपये मासिक वेतन मिळतं.

पोलीस महानिरीक्षक – IGP वेतन 1 लाख 44 हजार 200 रुपये आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक – (ADGP – Additional Director-General of Police) यांचं मासिक वेतन 2 लाख 5 हजार 400 रुपये आहे.

पोलीस महासंचालक – डीजीपी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो. त्यांचा मासिक पगार 2 लाख 25 हजार रुपये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ‘इतक्या’ लाखात गंडवल

Next Post

‘या’ 5 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

'या' 5 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us