Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साचलेल्या पाण्यात कागदी ‘नाव’ सोडली,प्रतिकात्मक मासेमारी करत व खड्यांमध्ये वृक्षारोपणही केलं ; राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

najarkaid by najarkaid
July 6, 2022
in जळगाव
0
साचलेल्या पाण्यात कागदी ‘नाव’ सोडली,प्रतिकात्मक मासेमारी करत व खड्यांमध्ये वृक्षारोपणही केलं ; राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  ईच्छा देवी चौक ते डी मार्ट या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली असुन या रस्त्यावर अर्धा फूट ते एक फूटापर्यंत खड्डे पडलेले आहेत . पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून जणू काही तलावच तयार झालेला आहे, रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांचे लहान – मोठे अपघात होत आहेत व अतोनात त्रास होत आहे . सदर रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा किंवा रस्त्याची किमान दुरुस्ती तरी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने साचलेल्या पाण्यात कागदी नाव सोडुन , प्रतिकात्मक मासेमारी करत व खड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले . सदर आंदोलनादरम्यान रस्तावरची वाहतूक बंद करण्यात आलेली होती .

आंदोलन सुरू असतांना याविषयी जाब विचारण्यासाठी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष राऊत यांच्याशी फोन वर चर्चा केली असता दोघांनीही रस्ता त्यांच्या अधिपत्याखाली येत नाही असे सांगितले , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही . वाहतूक बंद असल्याने याठिकाणी मोठया प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेली होती .

आंदोलनस्थळी एम आय डी सि पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरासे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करत लवकरच रस्त्याची समस्या मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले . सुमारे एक वर्षापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्ती साठी महानगरपालिकेच्या वतीने 25 लाखांची निविदा काढण्यात आलेली होती व बिल देखील अदा करण्यात आले . रस्त्याचे थातुरमातुर काम करून बिल पूर्ण काढण्यात आले , यासंदर्भात या प्रभागाच्या नगरसेविका खाटिक यांनी देखील काम न होता बिल काढण्यात आले अशी तक्रार दिलेली होती पण मक्तेदाराच्या प्रेमापोटी व आर्थिक हितसंबंध जोपासत सबंधितांनी या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले . याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे .

या रस्त्यावर अपघात होऊन नागरिकांना जिवीत हानी झाल्यास याची जबाबदारी कोण घेईल ? रस्ता महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नव्हता मग रस्ता दुभाजक व दुरुस्ती महानगरपालिकेच्या वतीने कशी करण्यात आली ? असे सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आले . सदर काम लवकरात लवकर न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखिल जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिलेला आहे .

यावेळी आंदोलनात जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , सरचिटणीस सुनील माळी , युवक अध्यक्ष रिकू चौधरी , दिलीप माहेश्वरी , राजू मोरे , रमेश बहारे , सुहास चौधरी , सुशिल शिंदे , रहीम तडवी , इब्राहिम तडवी सर , अर्षद उर्फ सोनू शेख , वासीम शेख , आरिफ शहा बापू , इरफान बागवान , अकिल बाबा शेख , सत्तार भाई वेल्डिंगवाले , अजीज शेख , इब्राहीम भाई खान , युनूस शहा , कुणाल बागुल , भला तडवी , हितेश जावळे , राजू बाविस्कर , संजय जाधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात जोरदार पावसाचा इशारा, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

Next Post

सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ

सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us