Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संविधान’ अभ्यासक्रमात हवं; राष्ट्रवादीची मोहीम

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in शैक्षणिक, राज्य
0
संविधान’ अभ्यासक्रमात हवं; राष्ट्रवादीची मोहीम
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मोहीम उघडली आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाची माहिती मिळावी म्हणून इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांसह काही अनुच्छेदांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिव स्नेहल कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. तसेच संविधानाची अंमलबजावणी शालेय स्तरावर करण्याबाबतचा एक अहवालही शिक्षण मंत्र्यांकडे देण्यात आला आहे. संविधानातील भाग ४मधील अनुच्छेद ५१ अ म्हणजेच मूलभूत कर्तव्य इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व पुस्तकांमध्ये पहिल्या पानांवर छापावीत, इयत्ता आठवी ते नववीच्या अभ्यासक्रमात संविधान भाग ३ आणि ४ मधील सर्व अनुच्छेदांचा समावेश करावा, अनुच्छेद १२ ते ५१ अ यांचाही समावेस करावा, अशी मागणी करतानाच इयत्ता आठवी आणि इयत्ता नववीसाठी कोणत्या अनुच्छेदांचा अभ्यासक्रमात समावेश असावा याची विस्तृत माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.

आगामी शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे जून २०२०पासून शालेय अभ्यासक्रमात या अनुच्छेदांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच प्रत्येक विषयानुरूप अभ्यासक्रमाची चित्रफित बनवावी, तसेच विद्यार्थ्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा घेऊन गुणांकन पद्धतीने त्यांना श्रेणी देण्याचेही मागणी यावेळी करण्यात आली आहे. संविधानाबद्दलची जागृती होणे गरजेचं आहे. आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य आजच्या पिढीला माहित असणे आवश्यक आहे. शिवाय संविधानाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कायद्याचं ज्ञानही मिळेल, त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन शालेय अभ्यासक्रमात संविधानाच्या काही भागांचा समावेश करण्यावर भर दिला पाहिजे, असं आवाहन विद्यार्थी नेत्या स्नेहल कांबळे यांनी केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परदेशी इतिहास शिकवण्यापेक्षा आपला इतिहास शिकवा: राज ठाकरे

Next Post

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us