Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

ठिबकवरील असंख्य पिकांची शिवराज सिंह चौहान यांच्याकडून पाहणी

najarkaid by najarkaid
March 19, 2026
in Uncategorized
0
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.१९ (प्रतिनिधी) – फळे, फुले व भाजीपाला या पिकांबरोबरच भात, गहू, मका, सोयाबीन, तूर, कापूस आणि कडधान्ये व तेलबियांची पिके ठिबक संचाच्या सहाय्याने घेतल्यास उत्पादन व उत्पादकतेत प्रचंड वाढ होऊन भारत शेतीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन प्रगत राष्ट्रांच्या यादीत कसा जाऊन बसेल हे विविध पिकांची जळगावच्या जैन हिल्सवरील प्रात्यक्षिके पाहून केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समजून घेतले.

नामदार चौहान यांनी आज जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने जैन हिल्सवर आधुनिक तंत्रज्ञानाने फळबागा व अन्य जी विविध पिके प्रात्यक्षिक म्हणून उभी करण्यात आलेली आहेत त्यांची पाहणी केली. जैन इरिगेशन कंपनीचे चेअरमन अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले. मागील वीस वर्षांपासून जैन हिल्सवर ठिबक संचाच्या आधाराने भाताचे पीक घेतले जाते आहे. ठिबकवर भाताचे पीक येऊच शकत नाही असा बहुसंख्य शेतकऱ्यांचा समज असून तसा प्रश्नही नामदार चौहान यांनी उपस्थित केला व या प्रयोगाबद्दल आश्चर्यही व्यक्त केले. मागील चौदा वर्षातील भाताच्या ठिबकवरील प्रयोगांची माहिती दिल्यानंतर प्रवाही व पाटाने दिलेल्या पाण्यापेक्षा ठिबकवरील भाताचे उत्पादन कितीतरी अधिक येऊन दाणा उत्तम पोसला जातो आणि पिकाची अनावश्यक वाढ रोखली जाऊन ते आडवे पडत नाही असे कंपनीच्या शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हां यापुढील काळात भात पिकविणाऱ्या राज्यांमध्ये ठिबक संचावर भात उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन ना. चौहान यांनी दिले.

Job Alert 

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…

Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

भाताबरोबरच हळद, आले, जैन स्वीट ऑरेंज, डाळिंब, आंबा व जैन संत्रा यांची नवीन तंत्रज्ञानाचा व टिश्यूकल्चरचा वापर करून उत्तम, सकस, दर्जेदार रोगमुक्त व व्हायरस फ्री रोपे कलमे जैन इरिगेशन कंपनी कशी तयार करते याची कृषिमंत्र्यांनी पाहणी करून माहिती घेतली. ग्रीनहाऊसमध्ये वाढविलेल्या केळी बागेला समक्ष त्यांनी भेट देऊन यासंबंधीचा व्हिडीओही त्यांनी स्वतःच्या आवाजात व्हायरल केला.👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com

हवामान बदल आणि तापमान वाढीच्या संकटातून शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर बंदिस्त व नियंत्रित वातावरणात म्हणजे ग्रीनहाउस, पॉलिहाऊस, शेडनेटमध्ये क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारची पिके कशी घेतली पाहिजेत यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. ‘सिक्स इन वन’ तंत्रज्ञान उष्ण वातावरणात ऊसासारख्या पिकाला कसे उपयोगी पडून उपादन वाढते हे देखील त्यांनी जैन हिल्सवर अनुभवले.

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

उष्ण व कोरड्या वातावरणात काळी मिरीचे पीक कसे सुंदर येते आणि हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग व क्लायमेट न्यूट्रल आलू टयूबर (बटाटा बियाणे) कसे तयार होते व शेतकऱ्यांसाठी ते कसे फायदेशीर ठरते याचे प्रात्यक्षिकही नामदार चौहान यांनी जैन हिल्सवर पाहिले.

👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com
या भेटीच्यावेळी ना. चौहान यांच्या समवेत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे (फलोद्यान) अतिरीक्त महासंचालक डॉ. बी. व्ही. पटेल, राज्याचे फलोद्यान संचालक अंकुश माने, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे डॉ. विजय दोहरे, सहसचिव प्रियरंजन दास, जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेमध्ये जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन आणि डॉ. के. बी. पाटील, डॉ. बी.के. यादव, डॉ. अनिल ढाके, डॉ. अनिल पाटील व बी. डी. जडे यांनी भाग घेतला. कंपनीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची यावेळी मंत्री महोदयांना माहिती देण्यात आली.

👉 ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com
आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, फ्युचर फार्मिंग आणि विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित शेतीची कास धरली तरच आपला देश प्रगतीच्या दिशेने जाऊ शकेल असा ठाम विश्वास ना. चौहान यांनी व्यक्त केला.

Spread the love
Tags: #AgricultureMinisterVisit#AgriDevelopment#CentralGovernment#FarmersSupport#IndiaNews#JainHills#jalgaon#KrishiVikas#MaharashtraNews
ADVERTISEMENT
Previous Post

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

Next Post

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us