१० वी पास तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने ASC सेंटरमध्ये विविध पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन जारी केलं आहे. तब्बल ४०० जागांसाठी ही भरती होणार आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत ऑफलाईन मोडद्वारे पात्र उमेदवार संरक्षण मंत्रालय भरती 2021 साठी अर्ज करू शकतात.
रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या
एएससी केंद्र (उत्तर), फक्त पुरुष उमेदवारांसाठी
१) सिव्हिल मोटर ड्रायव्हर: 115 पदं
२) क्लिनर: 67 पदं
३) कुक: 15 पदं
४) सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर: 3 पदे
एएससी केंद्र (दक्षिण)
५) कामगार (पुरुष): 193 पदं
६) एमटीएस (सफाई कर्मचारी): 7 पदे
पात्रता :
ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी भरतीचे नोटिफिकेशन बघावे
वयाची अट :
वय 18 ते 27 वर्षेदरम्यान असावे. तर इतर पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षेदरम्यान निश्चित करण्यात आलेय.
निवड अशी असेल?
कौशल्य / शारीरिक / सराव चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आवश्यक असल्यास लेखी परीक्षा देखील घेतली जाऊ शकते.
याप्रमाणे अर्ज करा
उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्जाशी संबंधित सविस्तर माहिती अधिसूचनेद्वारे मिळू शकते.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा