नवी दिल्ली – निवडणुकीत युती असलेल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षाशी आघाडी करून सत्ता स्थापन करणं लोकशाहीसाठी घातक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस-शिवसेनेचं आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. आगामी काळात शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी हा इशारा दिला आहे. निवडणुकीत एका पक्षाशी युती करायची आणि निवडणुकीनंतर इतर पक्षाशी आघाडी करायची हे सैद्धांतिकदृष्ट्या योग्य नाही. लोकशाहीसाठीही हे बरोबर नाही. शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात मतं मागितली होती. त्यामुळे जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला. पण नंतर केवळ मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली. हे लोकांनाही आडलेलं नाही, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.