Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांच्या ‘पॉवर गेम’ पुढं सगळेच फिके

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in Uncategorized
0
शरद पवारांच्या ‘पॉवर गेम’ पुढं सगळेच फिके
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- शरद पवार  ही व्यक्ती राजकारणात काय करू शकते, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा महाराष्ट्र व देशाला आला. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लढवय्या वृत्तीचा परिचय देणाऱ्या पवारांनी दरबारी राजकारणातही आपण किती पारंगत आहोत, याची झलक दाखवली आहे. आपल्या कूटनीतीनं पुतण्या अजित पवार यांचं बंड मोडून काढतानाच एका रात्रीत सत्ता स्थापन केलेलं सरकार ८० तासांत खाली खेचून पवारांनी भाजपच्या चाणक्यांना धोबीपछाड दिली आहे. पवारांच्या या ‘पावर गेम’मुळं सगळेच हैराण झाले आहेत. 

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युतीचं सरकार येईल, असं वाटत असतानाच सत्तावाटपावरून युतीमध्ये वाद झाला. हा वाद चिघळल्यानं शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरू केली. त्यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होऊन सरकार स्थापनेचा निर्णय झाला. मात्र, अजित पवार यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी करून थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. ‘भाजपच्या चाणक्यांनी शरद पवारांना धक्का दिला… पुतण्यानं काकांना कात्रजचा घाट दाखवला’, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार शांत होते. मीडियासमोर मोजकंच बोलत होते. ‘फाटाफुटीचं असं राजकारण ५० वर्षांत खूप पाहिलंय. भाजपचं सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, हे त्यांनी शपथविधीच्याच दिवशी सांगितलं होतं. पवार काहीतरी मोठी खेळी करणार याचे ते संकेत होते.

धल्या काळात शिवेसना, काँग्रेस व राष्ट्रवादीनं भाजपच्या सत्ता स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कायदेशीर लढाई सुरू असतानाच पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू होत्या. अजित पवारांसोबत गेलेल्या एकेका आमदाराला पवारांनी शिवसेनेच्या मदतीनं पुन्हा आपल्या तंबूत परत आणलं. अजित पवारांचा स्वभाव माहीत असलेल्या पवारांनी त्यांच्याशी पक्षाचे नेते व कुटुंबीयांमार्फत सातत्यानं चर्चा सुरू ठेवली. त्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव वाढवत नेला. दुसरीकडं, १६२ आमदारांची ओळख परेड जनतेसमोरच घडवून भाजपला आणि बंडखोर अजित पवारांना सूचक संदेश दिला. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं खुल्या पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश फडणवीस यांना दिले. त्यामुळं पवारांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे पारडे आणखी जड झाले. आता आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच अजित पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीमुळं भाजपही हतबल झाला. दोन दिवसांपासून बहुमताचे दावे करणाऱ्या भाजपच्या गोटात नाराजी पसरली. फडणवीसांना पुन्हा एकदा राजीनामा द्यावा लागला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Next Post

प्रतिभा पवार यांच्या प्रयत्नातूनच अजितदादा स्वगृही?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
प्रतिभा पवार यांच्या प्रयत्नातूनच अजितदादा स्वगृही?

प्रतिभा पवार यांच्या प्रयत्नातूनच अजितदादा स्वगृही?

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us