Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचा पाच वर्षाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार 

najarkaid by najarkaid
February 23, 2020
in जळगाव
0
वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचा पाच वर्षाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार 
ADVERTISEMENT

Spread the love

वाढदिवस अभिष्टचिंतन प्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव – रूग्णालयात येणारा प्रत्येक रूग्ण हा आपल्यासाठी देव आहे. त्याची ईश्वररूपी सेवा आपल्या हातुन घडत आहे. मोठ्या अडचणींचा सामना करीत गरीब रूग्णांसाठी हे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारले आहे. यावर्षी मेडीकल कौन्सील ऑफ इंडियाने पदविकेच्या जागा मंजूर करून एक अनोखे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे राज्यात या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे नाव अग्रेसर होण्यासाठी पाच वर्षांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज येथे केले. 

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला श्रीमती गोदावरी पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी कमलताई भिरूड यांनी ‘आज मी आहे आनंदात, कल्पवृक्षाचे झाड आहे माझ्या अंगणात’ ही कविता सादर केली. सत्काराला उत्तर देतांना माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक कर्मचार्‍याचा मोलाचा वाटा आहे. राज्यात नर्सिंग महविद्यालय आणि एमबीबीएस महाविद्यालयाने परिक्षेच्या निकालांमध्ये आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. वैद्यकीय रूग्णालयात येणार्‍या रूग्णांसाठी या वर्षी मोफत औषधोपचार मिळावे म्हणून दोन कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयातुन बाहेर पडणारा प्रत्येक डॉक्टर आणि परिचारक हा प्रोफेशनल असावा हे माझे स्वप्न आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिकच्या ५० जागा मंजूर करण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सर्वोत्कृष्ट होण्यासाठी पाच वर्षांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. यानंतर गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यांनी दिल्या शुभेच्छा
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. पाटील, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पुराणिक, रूग्णालयातील डॉ. माया आर्वीकर, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. विक्रांत वझे, डॉ. पाराजी बाचेवार, डॉ. नि.तु. पाटील, डॉ. चोपडे, डॉ. कांते, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील, एन.जी. चौधरी, प्रा. प्रवीण कोल्हे, विकास जावळे, विकास बेंडाळे, सुनील बोंडे, श्री. इंगळे, रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, हेमंत पाटील, केतकी मेडीकोजचे निलेश पाटील, ईबीएमचे संचालक सुनील चौधरी, शरद महाजन यांच्यासह महाविद्यालय व रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राहुल यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा- सलमान खुर्शीद

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे 25 रोजी कांताई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार राम सुतारांना

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे 25 रोजी कांताई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार राम सुतारांना

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे 25 रोजी कांताई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार राम सुतारांना

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us