Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वातील भूमी मातेच्या एकमेव मूर्तीची अमळनेरला स्थापना

संतश्री प्रसाद महाराजांसह अनेक मान्यवर झाले महापूजेत सहभागी

najarkaid by najarkaid
January 16, 2021
in जळगाव
0
विश्वातील भूमी मातेच्या एकमेव मूर्तीची अमळनेरला स्थापना
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर, (प्रतिनिधी)- येथील मंगळ ग्रह सेवा संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विश्वातील भूमिमातेच्या एकमेव मूर्तीसह श्री पंचमुखी मारुती व श्री मंगळदेव ग्रहाच्या पंचधातूच्या उत्सव मूर्तीची संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी या कार्यक्रमास भरीव अर्थसहाय्य केले.

तीन दिवस चाललेल्या या महासोहळ्याचे मुख्य यजमान मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व सौ. आशा महाले होते. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या विविध पूजा विधींमध्ये सपत्नीक सहभागी झाले होते.
श्री भूमिमाता व श्री पंचमुखी मारुती च्या प्रत्येकी साडेतीन फुटी मूर्ती काळया पाषाणातील आहेत. कर्नाटकातील गदग येथील घरंदाज व निष्णात मूर्तिकारांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्णरित्या दाक्षिणात्य शैलीत या मुर्त्या घडविल्या आहेत. त्यासाठी त्यांना तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागला.
धुळे येथील अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, निवृत्त पोलिस उपअधीक्षक शामकांत सोमवंशी, तहसीलदार सुदाम महाजन व मिलिंद वाघ, जळगाव येथील आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक अभिषेक बाफना, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,खारघरचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ,नाशिक येथील विक्रीकर उपायुक्त विजय पवार, ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, धुळे येथील ज्येष्ठ वकील देवेंद्र कुमार शिरोडे, ॲड. प्रदीप भट ,संत सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त दिलीप (राजू) नेरकर( नाशिक) छडवेल कोरडे (तालुका साक्री) येथील माजी सरपंच रत्नाकर पाटील, मॅनेजमेण्ट एक्सपर्ट वेदांशू पाटील ( नाशिक ) पाटबंधारे विभागाचे निलेशराव तराठे (जळगाव), सहाय्यक प्राध्यापक अतुल साबे( चोपडा ), बिल्डर श्यामशेठ गोकलानी ,प्रसन्न पारख व भरत सैनदाने , कॉन्ट्रॅक्टर शशिकांत पाटील (पाचोरा) , मुख्याध्यापक पी. एल. मेखा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल पाटील (मालेगाव ,माजी मुख्याध्यापक राजेंद्र निकुंभ, शिक्षक तथा पत्रकार विनोद कदम व उमाकांत हिरे, दैनिक लोकमतच्या जाहिरात विभागाचे रवींद्र बोरसे, लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य दिलीप गांधी व मनिष जोशी, रोटरी क्लबचे सदस्य विशाल शर्मा व आशिष चौधरी हे मान्यवर तीन सत्रात झालेल्या हवनात्मक पूजा – विधीत सपत्नीक सहभागी झाले होते.
तीन दिवसात राजकीय, सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने भेट दिली .त्यांना शक्य तितक्या वेळ ते पूजेतही सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले ,उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे तसेच अनेक सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.
ख्यातनाम पुरोहित केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते. तर प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य ,गणेश जोशी ,यतीन जोशी ,अथर्व कुलकर्णी ,सारंग पाठक ,निलेश असोदेकर, अंबरीष कळवे ,शुभम वैष्णव, सुनील मांडे, मयुर जोशी (नेवासा) परशुराम जोशी (नाशिक) सागर कुलकर्णी व प्रदीप जोशी (अहमदनगर) सहाय्यक पुरोहित होते .

भूमियागासाठी अमळनेर ठरणार अद्वितीय

साधारणत: ज्यांना रेती,शेती, माती ,जमीन -जुमला , घरा – दाराच्या समस्या असतात अशी मंडळी म्हणजेच शेतकरी, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट, बिल्डर, डेव्हलपर्स, दलाल आदी या समस्यांच्या निवारणार्थ किंवा वरील क्षेत्रात उत्तम व्यावसायिक यशासाठी भुमियाग करतात. या सर्व बाबींचे मूळ भूमि आहे. अमळनेरच्या श्री मंगळदेव ग्रह मंदिरात पूर्वीपासून भूमिपुत्र श्री मंगळग्रहाची मुर्ती होतीच .आता भूमिमातेची मूर्ती स्थापित झाली आहे .या दोन्ही देवतांच्या मूर्तींच्या साक्षीने होणारा भुमियाग आता विशेष अलौकिक व प्रभावी होईल अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. या दोन्ही देवतांच्या मूर्ती एकाच ठिकाणी विश्वात कुठेही नाहीत. त्यामुळेच आता अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर विश्वात भोमयागासह अन्यही पूजा – विधी तथा अभिषेकासाठी अद्वितीय ठरणार आहे . परिणामी धार्मिक क्षेत्रात अमळनेरचे नाव वैश्विक पातळीवर ठळकपणे अधोरेखित होईल .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

Next Post

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पडली

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पडली

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पडली

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us