Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करा – चंद्रकांतदादा पाटील

najarkaid by najarkaid
February 3, 2021
in राज्य
0
विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करा – चंद्रकांतदादा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याकडे केली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये मूळ उत्तर प्रदेशचा नागरिक असलेल्या उस्मानीने हिंदू समाजाच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विखारी वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

शरजिल उस्मानी हा उत्तर प्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यातील सिधारी या गावातील मूळ नागरिक आहे. हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणा-या उस्मानीच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. पण आज पाच दिवस झाले तरी त्याच्याविरोधात कुठलीच कारवाई महाराष्ट्रातील सरकारने केली नाही. तसेच यापुढेही त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल अशी खात्री सध्या वाटत नाही. त्यामुळे हिंदू विरोधात वक्तव्य करणा-या उस्मानीच्या विरोधात आपल्या सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात कुठलीही व्यक्ती कोणताही समाज वा धर्माच्या विरोधात अश्या प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे हा शरजिल उस्मानी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. पुणे येथील एल्गार परिषदेत त्याने त्याच्या भाषणात केलेले वक्तव्य हे समाजा-समाजामध्ये दुही माजविण्यासाठी कारणीभूत ठरेल अश्या प्रक्षोभक स्वरुपाचे आहे. त्याचे वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या संविधानिक संस्थाच्या विरोधातील असून हा एका अर्थाने देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे उस्मानीच्या विरुध्द तात्काळ एफआयर दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकरी धोरणाला हरताळ – डॉ.उल्‍हास पाटील

Next Post

पाचोऱ्याच्या चॉकलेट फॅक्टरीवर अन्न औषध विभागाची होणार कारवाई

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पाचोऱ्याच्या चॉकलेट फॅक्टरीवर अन्न औषध विभागाची होणार कारवाई

पाचोऱ्याच्या चॉकलेट फॅक्टरीवर अन्न औषध विभागाची होणार कारवाई

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us