Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल गांधीच्या विरुद्ध आज भाजपाचे राज्यभर निषेध आंदोलन!

najarkaid by najarkaid
February 8, 2024
in Uncategorized
0
मुहूर्त ठरला ; मंत्री गिरीश महाजनांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा आज भाजपात पक्ष प्रवेश निश्चित, प्रवेशाची मोठी यादीच आली समोर…
ADVERTISEMENT

Spread the love

राहुल गांधीनी केला संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान !

  • आशिष देशमुख यांचा आरोप
  • भाजपा राज्यभर आंदोलन करणार
  • ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

नागपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान श्री  नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, असा तिरपागडा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने भाजपाने त्यांच्याविरुद्ध कंबर कसली असून शुक्रवारी राज्यभर निषेध आंदोलन घोषित केले.भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नागपूर येथे संविधान चौकात तसेच प्रत्येक जिल्हा व तालुका केंद्रावर शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी  सकाळी ११.०० वा निषेध आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश  प्रभारी डॉ. आशिष देशमुख यांनी केली. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत

पंतप्रधान श्री  नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, गुजरातमध्ये सन २००० मध्ये ओबीसीत आणली असून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला. त्यांनी जातीनिहाय जनगणनेला (कास्ट सेन्सस) विरोध केला कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे असे बेताल व निर्ल्लज उदगार कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले असून, राहुल यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला.

नागपूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहिली आहे. पंडीत नेहरू यांनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या शिरफारशींचा विरोध केला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता.

डॉ. देशमुख म्हणाले की, राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत; कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे.  कॉंग्रेस तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फूट पाडत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला.

अनेक राज्यात कॉंग्रेसने ओबीसीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना हे आरक्षण देण्याचे प्रकार केलेले आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा कॉंग्रेसने कधीही दिलेला नाही. युपीए -२ च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही. धनगरांच्या आणि गोवारी जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल कॉंग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला आहे, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला ओबीसी मोर्चा अध्यक्ष संजय गाते, आ. कृष्णा खोपडे, भाजपा नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अर्चना डेहनकर, प्रशांत पाटील, रवींद्र चव्हाण, डी. डी. सोनटक्के, कमलाकर घाटोळे, नितीन गुडधे (पाटील), रवींद्र येनुरकर, शालिक नेवारे, विजय वासेकर श्रावण फरकाडे, सुनील हिरणवार, दिलीप ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश

Next Post

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्ष‍िक योजनेत ६०७ कोटींचा नियतव्यय मंजूर

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्ष‍िक योजनेत ६०७ कोटींचा नियतव्यय मंजूर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us