Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षकांची बुध्दिबळ पटावर यशस्वी चाल

najarkaid by najarkaid
April 8, 2022
in क्रीडा
0
राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षकांची बुध्दिबळ पटावर यशस्वी चाल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.8 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. प्रेसिडेंट कॉटेज, अजिंठा रोड या रिसॉर्ट येथे हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंढे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदकुमार गादिया, आॕल इंडिया चेस असोसिएशनचे आॕरबिटर कमिटीचे चेअरमन धर्मेंद्र कुमार, रेटिंग ऑफिसर गोपाकुमार, महाराष्ट्र चेस असोसिएशचे सचिव निरंजन गोडबोले व्यासपिठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तसेच बुध्दिबळ पटावर अभिजीत राऊत आणि डाॕ.प्रविण मुंढे यांनी पटावर चाल करून स्पर्धेची सुरूवात केली. प्रास्तविक करताना नंदलाल गादिया यांनी स्पर्धेबाबतची माहिती दिली. मंगेश गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2022/04/VID-20220408-WA0016.mp4

महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडू नागपूरची दिव्या देशमुख, औरंगाबादची तनिषा बोरामणीकर, साक्षी चितलांगे, जळगावची भाग्यश्री पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारतोषिके देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पर्धेला शुभेच्छा देताना सांगितले की, कोणत्याही शहराची ओळख ही क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांनी होते. या राष्ट्रीय स्तरावरील बुध्दीबळ स्पर्धेमुळे जळगावातील खेळाडूंना चांगले व्यासपिठ उपलब्ध झाले आहे. पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंढे स्पर्धेच्या आयोजनाने जळगावची ओळख क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने यासाठी सहकार्य करणारे अशोक जैन कौतुक केले. सचिव निरंजन गोडबोले राष्ट्रीय स्पर्धेसाठी अशोक जैन यांनी पाठबळ दिल्याने ती यशस्वी होत आहे.
क्रीडा क्षेत्रासाठी अशोक जैन व अतुल जैन यांचे नेहमी सहकार्य लाभलेले असते त्यामुळेच मोठ्या स्वरूपातील कार्य पुर्ण होण्यास शक्य होते.

जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे. महिला गटात एकूण ११ संघ तर पुरूष गटात २२ संघ सहभागी आहे.

पुरुष गटामध्ये एल आय सी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आर एस पी बी टीम, तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, भारतीय विमानतळ प्राधिकरण आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे.

तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच संघ,भारतीय विमानतळ प्राधिकरण
देखील स्पर्धेत सहभागी असेल.
भारतातील अग्रगण्य मोबाईल प्रिमीयर लिग फाउंडेशन (एम पी एल) व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (अर्थात साई) या संस्था अखिल भारतीय बुध्दीबळ महासंघाशी करारबध्द असून देशभरातील सर्व स्पर्धांसाठी त्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातल्या वीज संकटाबाबत ऊर्जामंत्री राऊतांची मोठी माहिती

Next Post

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; कारवाईची मागणी

Related Posts

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
Next Post
नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; कारवाईची मागणी

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us