जळगाव – सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख आहे. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला आहे. तर भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचे ज्यांनी नेतृत्व केले त्या महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली. तोच दिवस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर शहरातील रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयात विध्यार्थी व प्राध्यापक कर्मचाऱ्यानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
सदैव रायसोनी इस्टीट्यूटमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. यावेळी रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू , प्रा. तुषार पाटील, रजिस्टार अरुण पाटील, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील, सचिन कुलकणी, मोहम्मद झाकी, राहुल कापडणे, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश शर्मा, अजय चौधरी, चंद्रकांत ढाकणे, ज्ञानेश्वर येवले व महाविद्यालयातील विध्यार्थी उपस्थित होते.