Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ऑक्सिजन तुटवड्यावर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंची माहिती…

najarkaid by najarkaid
April 21, 2021
in राज्य
0
जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन संपला… काय म्हटले वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. २१: राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून परराज्यातून सुमारे ३०० मेट्रिक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या या संवादातील अधिक मुद्दे असे:

राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.
राज्यात अशा पद्धतीने एकूण १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे.

केंद्र शासनदेखील सुमारे ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्या माध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे.
राज्यात सहा ठिकाणं अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतुक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी जर ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय निर्मिती करता येणे शक्य आहे का याबाबत निर्णय घेण्यात येत आहेत.

पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर सी एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता ९८ टक्के असून रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३००० खाटांची भर पडणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.सिरम इन्स्टिट्यूट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना प्रति डोस ४०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयेप्रमाणे दर आकारणार आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लसीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लसीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये असल्याचे सांगतानाच कोविशिल्ड असो की आयात केलेली लस असो त्याचा उपयोग करून राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल- गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले संकेत

Next Post

आज जिल्ह्यात ११४२कोरोना बाधित आढळले तर कोरोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले

आज जिल्ह्यात ११४२कोरोना बाधित आढळले तर कोरोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us