Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेपासून महाविद्यालये सुरु होणार, पण…

Editorial Team by Editorial Team
September 14, 2021
in Featured, राज्य
0
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेपासून महाविद्यालये सुरु होणार, पण…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून देशात अनेक राज्यांमध्ये महाविद्यालये सुरु झाली आहेत. दरम्यान, आता  महाराष्ट्रातही १ नोव्हेंबरपासून कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार नसून ऑनलाइन माध्यमातूनच शिक्षण होणार  असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे कॉलेज सुरु होणार असली तरी प्रत्यक्ष वर्ग उघडण्यासाठी आणि आपल्या मित्र परिवाराला भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील सुचनेची वाट पाहावी लागणार आहे.

कॉलेजमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याबाबत करोनाची स्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन कॉलेज प्रत्यक्ष उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे उदय सामंत म्हणाले. पण सध्याच्या परिस्थितीत ऑफलाइन वर्ग सुरु करणे ही रिस्क असल्याचेही ते म्हणाले.

सर्वांनाच अद्याप COVID19 चा पहिला डोस मिळाला नाही. केवळ १७ ते १८ टक्के जणांनाच दुसरा डोस मिळाला आहे. जेव्हा संपूर्ण विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण होतील त्यावेळी ऑफलाइन वर्ग सुरु केले जातील असे शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले.

कोविड सेंटर म्हणून अनेक वसतिगृह घेण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून त्याचा आढावा घेतला. अनेक वसतिगृह अद्यापही कोविड सेंटर म्हणून आहेत. त्यात करोना रुग्ण संख्या वाढते आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये आढावा घेऊनच कॉलेजचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

दरम्यान, देशात अनेक राज्यांमध्ये महाविद्यालये सुरू झाली आहेत किंवा सुरू होण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली विद्यापीठात ५० टक्के क्षमतेसह १५ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत. १५ सप्टेंबरपासून पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के क्षमतेसह ग्रंथालय, प्रयोगशाळा, वर्ग खोली उघडण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. केरळमध्येही तांत्रिक, पॉलिटेक्निक आणि मेडिकलसह सर्व उच्च शिक्षण संस्थांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ ऑक्टोबरपासून संस्था सुरू होणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरी बसून बदला रेशन कार्डवरील मोबाईल नंबर ; जाणून घ्या कसे?

Next Post

जळगावात घरफोडी ; दीड लाखाचा ऐवज लंपास

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Next Post
बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला

जळगावात घरफोडी ; दीड लाखाचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us