पुणे प्रतिनिधी | लग्नाचे आमिष दाखवून तसेच महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत एका पाेलिस कर्मचाऱ्याने २८ वर्षीय शिक्षिकेवर वेळाेवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर गरोदर राहिलेल्या या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे.
याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात संशयित आराेपी आकाश प्रकाश पांढरे (३०) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच लैंगिक शोषण केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय महिला ही त्यांच्या मुलीसोबत भोसरी परिसरात राहतात. त्या एकट्या राहत असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपी आकाश याने आपण पोलीस असल्याचे सांगून महिलेला धमकावले. तू एकटी कशी राहतेस बघतो असे म्हणून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले.त्यानंतर त्याने महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार शारीरिक संबंध व अनैसर्गिक संबध ठेवले.महिला गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला घालून गर्भपात केला. असे फिर्यादीत म्हटले आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम करीत आहेत.
हे देखील वाचा :
आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ, जाणून घ्या
प्रतीक्षा संपली! मोदी सरकार EPF वर व्याज वाढवणार, या दिवशी होणार घोषणा
वाढत्या महागाईचा आणखी एक झटका, अमूलचे दूध इतके महागले
आयसर-दुचाकीचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच मृत्यू
आज कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ काम पूर्ण करा! नाहीतर तुमचे पैसे बुडतील
















