राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने ‘ मुख्यमंत्री वयश्री योजना’ सुरु केली असून ३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. समाजकल्याण विभाग या योजनेची माहिती तळागाळापर्यंत जावी यासाठी प्रयत्नशील आहे.
काय आहे ही योजना?
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता ३ हजार त्यांना मिळणार आहे.
पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट,
सर्व्हयकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.
एकरकमी 3000 रुपये थेट बँकेच्या खात्यात
राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र उपलब्ध करणे. मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थीना 3000 रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
योजनेचे स्वरूप
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता / + दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करता येतील. यामध्ये खालील उपकरणांचा समावेश…
1. चष्मा
2. श्रवणयंत्र
3. ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
4. फोल्डिंग वॉकर
5. कमोड खुर्ची
6. नि-ब्रेस
7. लंबर बेल्ट
8. सर्वाइकल कॉलर
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधारकार्ड / मतदान कार्ड
2. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स
3. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
4. स्वयं-घोषणापत्र
5. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष
• योजने अंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी 31 डिसेंबर 2023) अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील). ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल.