भुसावळ: कोरोनाचे संकट कमी होत असतांना आज रक्ताचा पुरवठा शासकीय रक्तपेढीत कमी असल्या कारणाने आज सामाजिक भान जोपासत कोरोना काळात जिल्हात रक्ताचा तुटवडा असल्याने भुसावळ विधानसभा युवक कॉग्रेस च्या वतीने युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांच्या मार्गदर्शनात भुसावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष ईम्रान खान यांनी मुस्लिम कॉलोनी, खडका येथे ईद मिलादुन्नबी च्या पवित्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार निळकंठ फालक होते. रक्तदान शिबीरात 52 स्क्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सामाजिक भान जोपासत ईद मिलाद उन नबी च्या पवित्र दीना निम्मित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे सर्वत्र युवक काँग्रेस चे भुसावळ शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुन्नावर खान, शहरअध्यक्ष रवींद्र निकम, विभाग के शहर अध्यक्ष सलीम गवली, रफीक पहेलवान, नजीम शाह, मोईनुद्दीन सर, ईद्रीस खान, छोटु भाई, हमीदा गवली व गोदावरी रक्तपेढीचे डॉ. भारंबे सर, डॉ. मेहरून नीसा, लक्ष्मण पाटील, अकबर सर यांच्या उपस्थित रक्तदान शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिरात अमीर खान इद्रिस खान, शे. सोऐब, शै. तोसीफ, शे. जमील, वसीम शाह, शे. रशीद, अमीर खान, शे. नूरु, मोईन मनीयार, इरफान खान, अलीम खान या युवकांनी रक्तदान शिबिराचे नियोजन सार्थ पने पार पाडली.