Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा – कलाम फाउंडेशन

najarkaid by najarkaid
August 25, 2020
in जळगाव
0
मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा – कलाम फाउंडेशन
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड (प्रतिनिधी) – राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कर्ज योजना, व्यवसाय परीक्षण व अन्य योजना राबविण्यासाठी सन २००० मध्ये मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व गरीब व गरजूंना लघुउद्योग व व्यवसाय करण्यासाठी विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत (कर्ज स्वरूपात) दिली जाती.

परंतु मागील काही वर्षांपासून महामंडळाच्या योजनांवर पुर्ण पणे अमलबजावणी होत नाही. तसेच या सर्व योजनांमध्ये आवश्यक बदल करून कर्जाची रक्कम, मुदत, उत्त्पन्नाची अट यात बदल करणे करजेचे आहे जेणेकरून अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त गरजूंना लाभ घेता येईल.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिक सक्षमीकरण करुन त्या माध्यमातून अल्पसंख्याक तरुणांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. महामंडळाचे प्राधिकृत भागभांडवल १५०० कोटी रुपये पर्यंत वाढवण्यात यावे. मौलाना आजाद शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत (कर्ज स्वरूपात) दिली जाते या योजनेत कर्जाची मर्यादा २.५० लाख इतकी आहे परंतु सद्याच्या काळात उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च पाहता ही रक्कम खुप कमी आहे जेणेकरून शैक्षणिक कर्ज योजनेची कर्ज मर्यादा १५ लाख करण्यात यावी तसेच उत्पन्नाची अट २.५० पासून किमान १० लाखापर्यंत करण्यात यावी, परतफेड मुदत ८ वर्ष करण्यात यावी व Income Tax भरणाऱ्या ही जामीनदाराची अट रद्द करण्यात यावी. यास बरोबर महामंडळामार्फत लघुउद्योग व छोटेमोठे व्यवसाय करण्यासाठी “उन्नती मुदत कर्ज योजना” ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५००० ते ५ लाखापर्यंत ची रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते. परंतु सद्याच्या काळात व्यवसाय करण्यासाठी ही रक्कम पुरेसी नाही त्यामुळे या योजनेत कर्ज मर्यादा ५०००००० पन्नास लाखापर्यंत वाढवण्यात यावी तसेच या योजनेसाठी उत्पन्नाची अट शहरी भागासाठी १.२० लाख रुपये व ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपये इतकी आहे तर उत्पन्नाची अट किमान १० लाखापर्यंत वाढवण्यात यावी व परतफेड ची मुद्दत ५ वर्ष एवजी ७ वर्ष करण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त गरजूंना या योजनेचा लाभ घेता येईल. अल्पसंख्याक समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी “सुक्ष्म पतपुरवठा योजना” राबवली जाते.
या योजने अंतर्गत नामांकित बचत गटांना २ लाखापर्यंत कर्ज स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. तरी या योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ५ लाखापर्यंत करण्यात यावी व परतफेड कालावधी ३६ महीने एवजी ४८ महिने करण्यात यावी. महामंडळामार्फत ” थेट कर्ज योजना ” राबवली जात होती परंतु काही वर्षांपासून या वर अमलबजावणी होत नाही. या योजने मुळे गरीब व गरजू अल्पसंख्याकांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी मदत भेटत होती. तत्काळ ही योजना राबविण्यात यावी व या योजने ची कर्ज मर्यादा १.५० लाखापर्यंत वाढवण्यात यावी. राज्यातील सर्व जिल्ह्यात महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात यावे व प्रत्येक कार्यालयात दोन कर्मचारी नियुक्त करण्यात यावे. तसेच जिल्हा कार्यालयात कामात हलगर्जी करणाऱ्या व अर्जदारांकडून पैसे ची मागणी करणाऱ्या कर्मचारी वर कडक कारवाई करण्यात यावी. लवकरात लवकर महामंडळावर संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात यावी.
सद्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे व कोरोना संकटामुळे सामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे जेणेकरून लोकांना मदतीची अत्यंत गरज आहे. वरील मगण्या लवकरात लवकर मंजूर करून तत्काळ महामंडळाच्या योजनेवर कडक अंमलबजावणी करण्यात यावे जेणेकरून अल्पसंख्याक समाजातील गरजू विद्यार्थ्यांना व नागरीकांना लाभ घेता येईल.
या मागण्यांचे निवेदन “कलाम फाउंडेशन” तर्फे तहसीलदार साहेब बोदवड यांच्या मार्फत मा. अल्पसंख्याक मंत्र, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले त्यावेळी फारूक शेख (उपअध्यक्ष कलाम फाउंडेशन),मुन्ताझिर अहेमद,आदिल खान,साबीर शेख,युनूस शेख,सैय्यद नईम,शेख जफर,हाफिज फिरोज,मौलवी अमीन,समीर शेख,कालीम शेख,नहीम खान बागवान उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रहार जनशक्ती पक्षा तफेॅ पाचोरा पत्रकार कोरोना योध्दा सन्मानित

Next Post

पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला महिला शिक्षिकांनी दिले १० ऑक्सिजन सिलेंडर भेट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला महिला शिक्षिकांनी दिले १० ऑक्सिजन सिलेंडर भेट

पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला महिला शिक्षिकांनी दिले १० ऑक्सिजन सिलेंडर भेट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us