Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुजे  महाविद्यालयात ३ व ४ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन

najarkaid by najarkaid
September 20, 2019
in जळगाव
0
मुजे  महाविद्यालयात ३ व ४ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने ३ व ४ ऑक्टोबर रोजी मुळजी जेठा महाविद्यालयात दोन दिवसीय पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होत आहे. विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर या प्रकारचे हे पहिलेच संमेलन होत आहे. खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी या अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या मुळजी जेठा महाविद्यालायातील बहिणाबाई साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात हे संमेलन होणार होते मात्र अतिवृष्टीमूळे ते स्थगित करण्यात आले होते.
गुरुवार, दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता काव्यरत्नावली चौक ते मु.जे.महाविद्यालय अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी १० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील राहतील. प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेता राहूल सोलापूरकर व केसीईचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेंडाळे असणार आहेत.  सकाळी ११ वाजता राहूल सोलापूरकर यांच्याशी मुक्तसंवाद होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता साहित्य संवाद अंतर्गत मान्यवर साहित्यिक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चांगले लिखाण असणाऱ्या व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करतील. सायंकाळी ५ वाजता खान्देशची लोकधारा अंतर्गत माहेरी आल्या बहिणाई हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये बोलीभाषेतील गाणी, उखाणे सादर केले जातील. रात्री ८:३० वाजता बालकवी ठोंबरे काव्यमंचावर कवीसंमेलन होईल.
शुक्रवार, दि.४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सोशल मिडीया आणि तरुणाई या विषयावर विद्यार्थ्यांचा परिसंवाद होईल.  त्यानंतर १० ते १२ या वेळेत कै.राजा महाजन कथामंचावर कथाकथन होईल. त्यानंतर १२ वाजता आम्ही काय वाचतो? या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी २ वाजता साहित्य आणि समाज या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३ ते ४ या कालावधीत कवी पुरुषोत्तम पाटील मंचावर फेसाटी कादंबरीकार व साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते नवनाथ गोरे आणि सुप्रसिद्ध कवी सुशीलकुमार शिंदे यांची प्रकट मुलाखत होईल. सायंकाळी ४ वाजता प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यार्थी साहित्य संमेलनाचा समारोप होईल. यावेळी हैदराबाद येथील डॉ. जयंत कुलकर्णी व जळगाव येथील शशिकांत वडोदकर हे प्रमुख अतिथी असतील अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, प्राचार्य उदय कुलकर्णी, विद्यार्थी विकास संचालक डॉ.सत्यजित साळवे, समन्वयक डॉ.विद्या व्यवहारे-पाटील यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्काराकरीता अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

स्व. बाबासाहेब के नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
स्व. बाबासाहेब के नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा

स्व. बाबासाहेब के नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us