Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळणार ; मुख्यमंत्री सकारात्मक?

najarkaid by najarkaid
December 9, 2024
in राज्य
0
महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळणार ; मुख्यमंत्री सकारात्मक?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळाल्यावर विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता पद मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरु असतांना महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेता करिता दावा करणार असल्याचं जाहिर केलं असल्याचं सांगितलं.

विरोधी पक्षनेता निवडीसाठी संख्याबळाची अट सांगितली जाते, पण कायद्यात तशी तरतूद नाही. विरोधी पक्षनेते पद आम्ही मागणार आहोत. पण त्याची प्रक्रिया विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर सुरू होते.

त्यामुळे अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आम्ही ही मागणी करणार आहोत, असे शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी सांगितले.

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या रविवारच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, गटनेते भास्कर जाधव, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, अजय चौधरी, संजय पोतनीस, सचिन अहिर, सुनील राऊत, नितीन देशमुख, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह महाविकास आघाडीचे अन्य आमदार उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर भास्कर जाधव व नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव म्हणाले की, राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे असतात तेवढेच विरोधक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले.

नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा राहिली आहे. विरोधी पक्षनेता यासंदर्भात व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत ‘आप’ने भाजपचा विरोधी पक्षनेता तयार केला होता. ही भूमिका आम्ही मांडली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यामध्ये कोणत्याही संख्याबळाची अट नाही. तशी कायद्यात तरतूद नाही. ही अट जाणीवपूर्वक सोयीनुसार लादलेली आहे. विरोधी पक्षनेते पद आम्ही मागणार आहोत. पण त्याची प्रक्रिया अध्यक्षांची निवड झाल्यावर सुरू होते. त्यामुळे त्यानंतर ती मागणी करणार आहोत, शिवसेना विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव म्हणाले.

मुख्यमंत्री सकारात्मक

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली व विरोधी पक्षनेता आणि विधानसभा उपाध्यक्ष ही पदे मिळावीत असा प्रस्ताव ठेवला. त्याला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Spread the love
Tags: Mahavikas Aghadi congress Ncp udhav thakare sharad pavar devendra fadanavis
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात महाराष्ट्र होमगार्डचा ७८ वा वर्धापन दिन साजरा

Next Post

दिव्यांग व्यक्तींसाठी जागतिक संधी आणि समावेशाच्या दिशेने महत्त्वपूर्ण सुधारणा” : आयुशी ( आयएएस )

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
दिव्यांग व्यक्तींसाठी जागतिक संधी आणि समावेशाच्या दिशेने महत्त्वपूर्ण सुधारणा” : आयुशी ( आयएएस )

दिव्यांग व्यक्तींसाठी जागतिक संधी आणि समावेशाच्या दिशेने महत्त्वपूर्ण सुधारणा" : आयुशी ( आयएएस )

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us