Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीत असलेल्या पक्षांबाबत मंत्री गिरीश महाजनाचं मोठं वक्तव्य

najarkaid by najarkaid
March 31, 2024
in जळगाव
0
महायुतीत असलेल्या पक्षांबाबत मंत्री गिरीश महाजनाचं मोठं वक्तव्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी सोबत येत ‘महायुती’ सरकार स्थापन केले आहे यासोबतच अजून इतर मित्र पक्षांना सोबत घेत भाजपा लोकसभा निवडणुक रिंगणात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उतरली आहे. ‘अबकी बार, ४०० पार ‘ नारा भाजपा दिला आहे, सोबतच भाजपात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली इन्कमिंग सुरु आहेत यामुळे भाजपाला लोकसभेत भरभरून यश मिळेल असा विश्वास आहे. दरम्यान राज्यातील असलेल्या ‘महायुती’ बाबत भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होतं आहे.

काय म्हटले मंत्री गिरीश महाजन….

मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की,महायुतीमधील सहभागी असलेले पक्ष फार काळ सोबत राहणार नाहीत, कारण लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे वक्तव्य महाराष्ट्राचे संकट मोचक व भाजपचे नेते व स्टार प्रचारक गिरीश महाजन यांनी जामनेर येथे पत्रकारांशी बोलताना केले.युतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना शून्य किंमत असून, जास्त दिवस ते सोबत राहणार नसल्याचे एक सूचक वक्तव्य नामदार गिरीश महाजन यांनी केले.

युतीतील पक्ष एकत्र राहिलेच तरी लोकांचा विश्वास नाही

जामनेर येथील कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार गिरीश महाजन म्हणाले की, ज्याप्रमाणे आघाडीमध्ये भांडणे सुरू आहेत. त्याचप्रमाणे महायुतीची परिस्थिती आहे. अजूनही भांडणे सुरू आहेत. ही भांडणे टोकाची करत आहेत. मैत्रीपूर्ण लढत करू असे युतीमधील पक्षांकडून दावा केला जात आहे. परंतु हे फार काळ सोबत राहणार नाहीत असे वाटते आणि राहिलेच तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असेदेखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

लोकांना केवळ मोदींचे नेतृत्व मान्य-गिरीश महाजन

लोकांना एकच नेतृत्व म्हणजे मोदींचे नेतृत्व मान्य आहे. त्यांना पंतप्रधान करायचंय, कोणीही निवडणुकीमध्ये युती, आघाडी, महाआघाडी केल्या तरी, त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही. याचा अर्थ असा की मतदार फक्त भाजपालाच वोटिंग करणार असल्याचा दावादेखील गिरीश महाजन यांनी आपल्या वक्तव्यातून माध्यमांशी बोलताना केला.

Spread the love
Tags: #ajitdadapawar #ncp #mantralaynirnay#maharashtra #bjp #devendra fadanvis #mangesh chavhan #sharad pawar #राजकारण#girish mahajan
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यासाठी ‘या’ तीन स्थानिक सुट्या जाहिर

Next Post

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर ; संपूर्ण ४० नेत्यांची यादी वाचा

Related Posts

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर ; संपूर्ण ४० नेत्यांची यादी वाचा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर ; संपूर्ण ४० नेत्यांची यादी वाचा

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us