Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय खाद्य निगमकडून इंडियन रेडक्रॉस सोसायटीस एक मेट्रीक टन तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध

najarkaid by najarkaid
May 4, 2020
in जळगाव
0
भारतीय खाद्य निगमकडून इंडियन रेडक्रॉस सोसायटीस एक मेट्रीक टन तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,  दि. 4 – कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या मदत आणि सहाय्यतेसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा जळगाव यांना डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी जळगाव यांचे निर्देशानुसार भारतीय खाद्य निगम यांचेकडून शासनाच्या Open Market Sales Scheme अंतर्गत नुकताच एक मेट्रीक टन तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
कोरोना विषाणु संसर्गामुळे लॉकडाऊन कालावधीत निवारागृह आणि अन्न व्यवस्थेबाबत करावयाच्या तातडीच्या उपाययोजनेनुसार भारतीय खाद्य निगम यांच्य Open Market Sales Scheme (OMSS) अंतर्गत कम्युनिटी किचन भोजन व्यवस्था करणेसाठी सवलतीच्या दरात भारतीय खाद्य निगमकडून गहू आणि तांदूळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी कम्युनिटी किचन अंतर्गत कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, धर्मदाय संस्था यांनी जिल्हाधिकारी यांचेकडेस विहित प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. असा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे शिफारशीसह भारतीय खाद्य निगमकडे पाठवला जातो. प्रस्ताव खाद्य निगम यांचेकडून मान्य झाल्यावर संबंधित संस्थेने निगमच्या बँक खात्यात आवश्यक खरेदीची रक्कम जमा केल्यावर संबंधित संस्थेच्या नावाने वितरण आदेश निर्गमित करण्यात येतात. त्यानुसार अर्जदार संस्था त्यांचे जिल्ह्यातील खाद्य निगमच्या डेपोतून धान्य उचल करते. सद्यस्थितीत अशा संस्थांसाठी गहू 21 हजार रुपये प्रति मे. टन आणि तांदूळ 22 हजार रुपये प्रति मे. टन असे सवलतीचे दर भारतीय खाद्य निगमकडून निश्चित करण्यात आले आहे. सवलतीच्या दरातील गहू आणि तांदूळ कमीत कमी एक मे. टन खरेदी करणे आवश्यक असुन जास्तीत जास्त खरेदीसाठी मर्यादा नाहीत.
भारतीय खाद्य निगमच्या या स्कीममध्ये समावेश होऊन अन्नाधान्य सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणेबाबत प्रस्ताव इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा जळगाव यांनी नुकताच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी संस्थेच्या विनंतीची तात्काळ दखल घेऊन भारतीय खाद्य निगम, मनमाड यांना सवलतीच्या दराने एक मे. टन तांदूळ उपलब्ध करुन देणेबाबत शिफारस केली होती. भारतीय खाद्य निगम, मनमाड येथील अधिका-यांनी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या शिफारशीनुसार तात्काळ कार्यवाही करुन संस्थेस आवश्यक रक्कम ऑनलाईन स्वरुपात शासन जमा करणेबाबत सुचित केले होते. संस्थेने आवश्यक रक्कम खाद्य निगमच्या खात्यात जमा केल्यावर संस्थेस धान्य वितरण आदेश देणेत आले आहेत. इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांना जळगाव येथील MSWC गोदामातून एक मे. टन तांदूळ उपलब्ध करुन देणेत येत आहे.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि सहाय्यतेसाठी ज्या संस्थांना भारतीय खाद्य निगमच्या OMSS अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य हवे असल्यास संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावात संस्थेचे नाव, कार्य, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी तसेच संस्थेस कोणत्या बाबींसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य हवे, किती हवे आहे. संस्थेस सवलतीच्या दराने मान्यता मिळाल्यास संस्था खाद्य निगमकडे विहित आवश्यक खरेदी मुल्य भरणेस तयार असलेबाबतचा उल्लेख इ. बाबत माहिती संस्थेच्या लेटर पॅडवर सादर करावी.
संस्थेने सादर केलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव शिफारशीसह भारतीय खाद्य निगम यांचेकडे साद करणेत येतो. खाद्य निगम यांचेकडून प्रस्तावास मान्यता देणेत आल्यावर संबंधित संस्थेस विहित खरेदी मुल्य ऑनलाईन भरणा करणेबाबत सुचित करणेत येते. भरणा झाल्यावर संस्थेच्या नावाने त्वरीत धान्य वितरण आदेश देणेत येतात. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, धर्मदाय संस्था यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अडकलेल्या कामगार,मजुरांची जिल्ह्याबाहेर गावी जाण्याची माहिती भरण्यासाठी तहसील कार्यालयात कर्मचारी नियुक्त !

Next Post

जळगाव जिल्ह्यात उद्या पासून ग्राहक उपयोगी दुकाने सुरु होणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात उद्या पासून ग्राहक उपयोगी दुकाने सुरु होणार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us