Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार : श्रीराम पाटील

najarkaid by najarkaid
April 23, 2024
in Uncategorized
0
बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार : श्रीराम पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड,(प्रतिनिधी)- रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांनी मंगळवारी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड तालुक्यात भेटीगाठी घेतल्या.बोदवड तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असलेले निमखेडी श्री पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. गावात घराघरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिलांनी औक्षण केले. तर नागरिकांनी श्रीराम पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. ग्रामस्थांचे असलेले प्रेम पाहून उमेदवार पाटील भारावून गेले. यावेळी त्यांनी गावाला ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा देखील आपण प्रयत्न करू असे यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना सांगितले.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत हनुमानाचे हनुमान जयंतीच्या निमित्ताने दर्शन घेत मतदारांच्या भेटीला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, माफदाचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख विनोद पाडर , राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील, शिवसेना (उबाठा ) पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन खोडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत पाटील, मुक्ताईनगर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष माजी सभापती किशोर गायकवाड, माजी सभापती गणेश पाटील, विजय चौधरी, श्याम पाटील, सखाराम पाटील, वीरेंद्रसिंग पाटील, डॉ अविनाश घाटे, प्रवीण जैन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोदवड तालुक्यातील सिरसाळा, चिंचखेड, नाडगाव, नांदगाव, राजुर, वरखेड खुर्द, ऐनगाव, घाणखेड येथे भेटी देत मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला.

निमखेडीला स्मार्ट व्हिलेज बनवणार : श्रीराम पाटील
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे निमखेडी मूळ गाव आहे. येथे भेट दिल्यावर ग्रामस्थानी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यामुळे भारावलेल्या श्रीराम पाटील यांनी गावाचे ऋण फेडण्यासाठी गावाला स्मार्ट व्हिलेज बनविण्याचा निर्धार ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी रमेश सुरंगे, विकास पाटील, तुकाराम पाटील, पंजाब वाघ, संतोष पाटील, संतोष निकम, गोपाळ पाटील, सौ संगीता विलास पाटील, आत्माराम पाटील, सुरेंद्र सर, गुणवंत गलवाडे, यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगांवसाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज तर रावेरसाठी 04  उमेदवारांनी दाखल केले 06 अर्ज

Next Post

रामेश्वर कॉलनीत मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
रामेश्वर कॉलनीत मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्याहस्ते  आरती

रामेश्वर कॉलनीत मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us