Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती

najarkaid by najarkaid
September 18, 2021
in जळगाव
0
बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.18 प्रतिनिधी – ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये 122 च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे.

चित्रकार आणि चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरीने हा उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात आहे. तसेच बद्रीनारायण, संभाजी कदम, ग.ना.जाधव यासारख्या दिवंगत चित्रकारांनी रेखाटलेली सुबक चित्रे नव्या पिढीला कळावीत यासाठी या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

यासह ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, विजयराज बोधनकर, प्रतिमा वैद्य, कैलास संन्याल या प्रसिद्ध कलावंतांच्याही कलाकृती यामध्ये आहेत. कलाक्षेत्रातील मान्यवरांसोबत जळगावमधील चित्रकार राजू बाविस्कर, शाम कुमावत, यशवंत गरूड यांच्यासह जैन इरिगेशनच्या आर्ट विभागातील चित्रकार विजय जैन, आनंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा कलाकृती बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये अवतरल्या आहेत. जळगावमधील कलावंतांसाठी ही बाब भूषणावह आहे. मंगलमूर्तीच्या विविध रूपांच्या रंगरेषांच्या गणेश कलाकृतींचे प्रदर्शन दि.9 ते 25 सप्टेंबरपर्यंत पाहता येणार असून सायंकाळी 5 ते 9 यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Home Loan साठी अर्ज करताय? आधी जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी

Next Post

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; खाद्य तेलाच्या किमतीत घट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; खाद्य तेलाच्या किमतीत घट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us