Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्ह्यातील 65 हजार लाभार्थ्यांना 27 कोटी 31 लाख रुपयांचे अनुदान वितरीत

najarkaid by najarkaid
December 7, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 7 (प्रतिनिधी) – भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात दि. 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वित केलेली आहे.

            राज्यातील प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता, ज्यांची गर्भधारणा 1 जानेवारी, 2017 रोजी अथवा तद्नंतर झाली असेल. अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जीवीत अपत्यासाठी दिला जात आहे. या योजनंतर्गत 3 टप्प्यांमध्ये पाच हजारांचे अनुदान दिले जाते. पहिल्या हप्त्यासाठी  संबंधित लाभार्थ्याला मासिकपाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसूतिपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी पासुन गोवर, रुबेलापर्यंतचे संपुर्ण लसीकरण व त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थीच्या आधारलिंक बॅक खात्यात लाभ जमा केला जातो.

या योजनेंतर्गत आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील 65 हजार 3 पात्र महिला लाभार्थ्यांनी तब्बल 27 कोटी 31 लाख 23 हजारांचे अनुदान ऑनलाईन DBT व्दारे वितरीत करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी त्याबाबत तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबंधीत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका समुह संघटक, आशा, गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील पात्र प्रथम खेपेच्या गरोदर मातांनी आरोग्य विभागातील आशा कर्मचाऱ्यांकडे त्वरीत नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. समाधान वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी, मनपा, जळगाव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, ऑनलाईन अभिवादन करुन लाखो अनुयायांनी सर्वांसमोर एक अनोखे उदाहरण ठेवले

Next Post

नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us