जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम नामविस्तार दिनानिमित्त रविवार दि.11 ऑगस्ट रोजी विद्यापीठात परिवर्तन निर्मित घ्अरे संसार संसारङ हा बहिणाबार्इंच्या गीत आणि कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गतवर्षी 11 ऑगस्टला राज्य शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा केला. या प्रथम नामविस्तार दिनानिमित्त रविवारी दुपारी 2.00 वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात परिवर्तन जळगाव निर्मित घ्अरे संसार संसारङ ही शेती मातीशी नातं सांगणाज्या बहिणाबार्इंची गीते आणि कवितांची सुरेल मौफल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील राहणार असून प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहुलीकर यांची उपस्थिती असेल अशी माहिती कुलसचिव भ.भा.पाटील यांनी दिली. रविवारी नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाचे प्रशासकीय व शौक्षणिक विभाग सुरु राहणार आहेत.