Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात युवक ,बस चालक व पोलिसांच्या पाच लाखांची रोकड व २५ तोळ्याच्या दागिन्यांसह वृद्ध सुरक्षित

najarkaid by najarkaid
June 24, 2020
in जळगाव
0
पाचोऱ्यात युवक ,बस चालक व पोलिसांच्या पाच लाखांची रोकड व २५ तोळ्याच्या दागिन्यांसह वृद्ध सुरक्षित
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील तारखेडा येथील युवक ,चाळीसगाव आगारातील बस चालक व पाचोरा पोलीस या त्रिमूर्तीच्या सजगतेमुळे व मानवतेमुळे वृद्धा सह त्यांचे जवळ असलेली पाच लाखांची रोकड व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने त्यांच्या मुलीकडे सोपविण्यात आले. या कामगिरीचे कौतुक होत आहे .

मध्य रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झालेले मुरलीधर सोनवणे (वय 80) हे सध्या पिंप्राळा (ता जळगाव )येथील दांडेकर नगरात एकटेच वास्तव्यास आहेत .त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत .दोन्ही मुले मुंबई भागात नोकरीस आहेत तर मुलीही त्यांच्या संसारात रमल्या आहेत. टाकळी प्र चा. (ता चाळीसगाव) येथील मंदाकिनी चव्हाण ही त्यांची मुलगी शिक्षिका असून तिच्याकडे मुरलीधर सोनवणे यांचे नेहमी जाणे येणे व बराच काळ वास्तव्य असते. गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या मुलीकडे टाकळी याठिकाणी होते. सोमवार ता 22 रोजी सकाळी मी मंदिरात दर्शनासाठी जाऊन येतो असे सांगून ते निघाले मंदाकिनी चव्हाणही शाळेत निघून गेल्या. प्रवासी वाहतूक बंद असल्याने मुरलीधर सोनवणे हे एका ट्रकने पाचोरा पर्यंत आले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेल्वे पुलाजवळच्या तारखेडा फाट्यावर ते ट्रक मधून उतरले. प्रवासाचा थकवा आल्याने रस्त्याच्या कडेला आपल्या सोबत असलेली पिशवी डोक्याखाली घेऊन ते लेटले .त्यांना झोप लागली. यावेळी तारखेडा (ता पाचोरा) येथील तुषार मोराणकर हा युवक आपल्या वडिलांसह दुचाकीने तारखेडा येथे जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या सोनवणें जवळ थांबला त्याने त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला ,विचारपूस केली परंतु ते बोलत नसल्याने तुषारने त्यांच्या डोक्याखाली असलेल्या पिशवीला हात लावून त्यात ओळख पटण्या इतपत कागदपत्र आहेत की नाही या विचाराने पिशवीला हात लावला असता सोनवणे भानावर आले. त्यावरून पिशवीत किमती वस्तू असाव्यात असे तुषार मोराणकर यांच्या मनात आले. त्यांनी या वृद्धाबाबत पोलिसांना कळवले. सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, पोलीस हवालदार दीपक सुरवाडे, दामोदर सोनार हे बबलू मराठे याच्या रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले .त्यांनी सदर वृद्धास पाचोरा पोलीस ठाण्यात आणून त्यांची ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली त्यांची विचारपूस केली असता त्याची कहाणी ऐकून पोलिसही चक्रावले.
या वृद्धांच्या पिशवीत 5 लाख रुपयांची रोकड व मयत झालेल्या पत्नीचे 25 तोळे सोन्याचे दागिने होते. दोन्ही मुले मुंबईला राहतात त्यांना माझ्या आयुष्याची ही जमापुंजी व त्यांच्या मृत आईचे दागिने वाटप करायचे आहेत असे रडत रडत त्यांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलीसही भावनिक झाले. आम्ही तुम्हाला ओळखत नाहीत असे मुलं म्हणतात मग त्यांच्या घरी जायचे कसे असेही या वृद्धाने स्पष्ट केले.त्यांच्या बोलण्यावरून चाळीसगाव चा उल्लेख झाल्याने पोलीस हवालदार राहुल सोनवणे यांनी चाळीसगाव बस आगारात चालक असलेले सुनील मराठे यांच्याशी संपर्क साधून वृद्धा संदर्भात माहिती दिली सुदैवाने सदर बस चालक या वृद्धास ओळखत असल्याने त्यांनी पोलिसांना मंदाकिनी चव्हाण यांचा मोबाईल क्रमांक दिला त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांना पाचोरा येथे बोलावण्यात आले. वृद्धाची मुलगी पाचोरा पोलीस ठाण्यात आल्यावर तिला आपल्या पित्यास पाहून रडू आले. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, गणेश चोभे ,विकास पाटील यांनी त्या वृध्दा जवळ असलेली पाच लाखांची रोकड व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने त्यांच्या मुलीकडे सोपवले व त्यांना टाकळी कडे मार्गस्थ केले .
तारखेडा येथील तुषारने रस्त्यावर पडलेल्या या वृध्दाची चौकशी केली नसती व पोलिसांना कळवले नसते तर कदाचित त्यांच्या जवळचा लाखो रुपयांचा ऐवज हा कुणीतरी पळवला असता अथवा एखादी अघटित घटना ही घडली असती. परंतु तुषार , बस चालक मराठे व पोलिसांची सजगता आणि मानवता यामुळे लाखो रुपयांच्या ऐवजा सह वृद्ध पित्याला मुलीच्या ताब्यात देण्यास पोलीस यशस्वी झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी – मंत्री अशोक चव्हाण

Next Post

भडगाव कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेची कार्यकारिणी जाहिर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us