Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या चर्चेमुळं भाजपची धावाधाव

najarkaid by najarkaid
December 2, 2019
in राज्य, राजकारण
0
पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या चर्चेमुळं भाजपची धावाधाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भाजपच्या नेत्या व माजी मंत्री  पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळं भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  व विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘पंकजांच्या पक्षांतराच्या बातम्या या केवळ अफवा आहेत. त्या भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. 

परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे नाराज आहेत. पक्षातीलच काही लोकांनी आपल्याविरोधात काम केल्याची त्यांची भावना झाल्याचं बोललं जातं. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळं यात भर पडली. त्यातच आज त्यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचा उल्लेख काढल्यानं संभ्रम निर्माण झाला. त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्येही यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं. या साऱ्याची दखल घेऊन पाटील यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली व खुलासा केला.

पंकजा मुंडे वेगळा विचार करताहेत ही केवळ अफवा आहेत. आमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या वाढीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं मोठं योगदान आहे. पंकजा या त्यांच्याच तालमीत घडल्या आहेत. त्या भाजपमध्ये आहेत आणि राहतील, असं पाटील म्हणाले. ‘१२ डिसेंबर ही गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,’ असं ते म्हणाले.

पंकजा यांच्या मामेबहीण व खासदार पूनम महाजन यांनीही या वृत्ताचं खंडन केलं आहे. ‘पंकजा पराभवामुळं व्यथित आहेत. पण त्या पक्ष सोडणार नाहीत. मी स्वत: पराभव पाहिला आहे. त्यामुळं मी त्यांची स्थिती समजू शकते,’ असंही महाजन म्हणाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्यावतीने पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन

Next Post

भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर: संजय राऊत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर: संजय राऊत

भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर: संजय राऊत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us