Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे

भाजपा प्रदेशाध्यक्ष ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

najarkaid by najarkaid
January 16, 2021
in राज्य
0
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चा तर्फे सोमवारपासून राज्यव्यापी घेणार हा पवित्रा..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,- बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे खुलासा करताना आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्माशी आपले विवाहबाह्य संबंध असून त्यातून दोन मुले जन्माला आल्याची व त्यांना आपण आपले नाव दिल्याची जाहीर कबुली दिली आहे. हे ध्यानात घेता, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली‌. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांची कबुली प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची आपण मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरोप गंभीर असून लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले होते. पवार यांची राजकीय कारकीर्द ध्यानात घेता ते अशा आरोपानंतर स्वतःहून कारवाई करतील असे वाटले होते. पण पवार यांनी नंतर घुमजाव केले. बलात्काराच्या आरोपांची चौकशी केलीच पाहिजे. पण बलात्काराचे आरोप आणि विवाहबाह्य संबंधांची कबुली या दोन प्रकरणांची गल्लत करू नये. मंत्र्यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे किंवा शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

त्यांनी सांगितले की, आतापर्यंत अशा प्रकारे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. सन १९८४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांनी विमानात गैरवर्तन केल्याचा आरोप हवाई सुंदरीने केला होती. त्यावेळी १४ मंत्री आदिक यांच्यामागे ठामपणे उभे होते. पण तरीही त्यांना राजीनामा द्यावा लागला. सन २००९ साली आंध्र प्रदेशचे राज्यपाल एन. डी. तिवारी यांना त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजीनामा द्यावा लागला होता. सन २०११ मध्ये राजस्थानचे जलसंपदामंत्री मदेरणा यांनाही नर्सचे अपहरण आणि लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. सन २०१३ मध्ये राजस्थानचे दुग्धविकास मंत्री बाबुलाल नागर यांनाही बलात्काराच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला होता. सन २०१६ मध्ये दिल्लीचे समाजकल्याण मंत्री संदीप कुमार यांची अश्लिल व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजीनामा द्यावा लागला होता. तसेच २०१८ मध्ये एम.जे. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराने आरोप केल्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या उदाहरणावरून शरद पवारांनी नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा.

ते पुढे म्हणाले की, दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांचा राजीनामा घेताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, ‘माझ्या ६७ आमदारांना राजीनामा द्यावा लागला तरी चालेल. पण अशा घटना कदापिही खपवून घेतल्या जाणार नाहीत.’ राजस्थानचे मंत्री बाबुलाल नागर यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हणाले होते की, ते निर्दोष आहेत. पण आरोप झाल्याने राजीनामा देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण पदावर राहिल्यास याची निष्पक्षपणे चौकशी होणार नाही, असे आपण समजतो. ही उदाहरणे ध्यानात घेऊन धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. सोमवारी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको‌, काळजी घ्या…

Next Post

रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन

रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us