भोकरदन : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. अशातच नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालना (Jalna) जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील एका गावात एका तरुणाने दीर आणि वहिनीच्या नात्याला कलंक लावला आहे. नराधमाने आपल्या वहिनीला शेतात फरफटत घेऊन जात तिच्यासोबत अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास हसनाबाद पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. घटनेच्या दिवशी गुरुवारी आरोपीनं 23 वर्षीय पीडित महिलेला ज्वारीच्या शेतात फरफटत घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत, तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे. पण पीडित महिलेनं हिंमत दाखवून आरडाओरडा केल्यानं पीडितेचा पती घटनास्थळी पळत आला.
यावेळी आरोपी दिराने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दिरानेच आपल्या वहिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 23 वर्षीय वहिनीनं हसनाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपी दीर बाबासाहेब गव्हांडे याला अटक केली आहे. पोलीस आरोपीचा कसून तपास करत आहेत.
हे देखील वाचा :
अखेर भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन मागे
.. आता पुढचा नंबर राऊत अन् परब यांचा”; किरीट सोमय्यांचा इशारा
‘या’ वेब सिरीजमध्ये अमिका शेलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
पावरी गाण्यावर ‘या’ जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल
















