Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

najarkaid by najarkaid
May 1, 2024
in Uncategorized
0
निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. ३० : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास “स्वीप” च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालक दीपाली मासिरकर, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सल्लागार साधना राऊत, `अपने आप` स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू व्यास, नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

दीपाली मासिरकर म्हणाल्या, ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आयोजित आजच्या मतदान जनजागृती उपक्रमात एक जागरूक मतदार म्हणून मोठ्या संख्येने सहभागी झालात. तुम्ही जागरूक झालात तुमच्या सोबतच्या सगळ्यांना मतदान करण्यास सांगावे. आपल्या एक-एक मताचे योगदान महत्त्वाचे आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ केली आहे. देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत’, असे त्यांनी सांगितले तर मतदानातील सहभागाबाबतही श्रीमती मासिरकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

श्रीमती मुकादम यांनी मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे, त्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्व या महिलांना पटवून दिले. मतदान करणे हा आपला हक्क आहे. तुम्ही स्वतः मतदान करा आणि आपल्या परिसरातील  महिलांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून तो आपला अधिकार आहे. २० मे २०२४ रोजी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्रीमती राऊत म्हणाल्या, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकही जण मतदानापासून वंचित राहू नये, प्रत्येक घटकाने मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढावा, हा उद्देश आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी केले. आभार तहसीलदार पल्लवी तभाने यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील

Next Post

शिवाजीनगर परिसरात महायुती उमेदवार स्मिताताई वाघ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी रिंग रोड परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

शिवाजीनगर परिसरात महायुती उमेदवार स्मिताताई वाघ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us