Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात

केंद्र सरकार कडून गरजेनुसार लसींचा पुरवठा झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा - आरोग्य मंत्री राजेश टोपे

najarkaid by najarkaid
April 8, 2021
in राज्य
0
राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचं मोठं विधान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. ८ : कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के सक्रिय रुग्ण असताना महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. कोरोनाच्या संकट काळात केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून जनतेला वाचवले पाहिजे ही काळाची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते.

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले,लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र शासनासोबत वाद-विवादाचा विषय नाही. मात्र 6 कोटी लोकसंख्या असलेल्या आणि सध्या 17 हजार सक्रिय असलेल्या गुजरात राज्याला लसीचे 1 कोटी डोस देण्यात आले. गुजरातच्या दुप्पट लोकसंख्या आणि सुमारे साडे चार लाख सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्रालाही 1 कोटी 4 लाख डोस देण्यात आले. त्यातील सुमारे 9 लाख डोस शिल्लक आहेत. त्यामुळे सातारा,सांगली, पनवेल या ठिकाणी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्राची मागणी दर आठवड्याला 40 लाख डोस देण्याची असताना प्रत्यक्षात 7.5 लाख डोस देण्यात येणार आहेत. याबाबत आज पुन्हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यात 15 एप्रिलनंतर वाढ करून 17.5 लाख डोस पुरविण्यात येणार आहेत.

सध्या महाराष्ट्राला साडेसात लाख डोस देतानाच उत्तर प्रदेशला 48 लाख,मध्ये प्रदेशला 40 लाख, गुजरातला 30 लाख आणि हरियाणाला 24 लाख डोस पुरविण्यात आले. मात्र लसीकरणात अग्रेसर असलेल्या आणि सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला फक्त 7.5 लाख डोस देण्यात आले आहेत.

रुग्ण संख्या,चाचण्या, सक्रिय रुग्ण याबाबत महाराष्ट्राची अन्य राज्यांशी तुलना केंद्र शासनाने दर दश लक्ष हे प्रमाण लावावे आणि त्याप्रमाणे तुलना करावी. तसे होताना दिसत नाही.
अनेक विकसीत देशांनी 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन 18 ते 40 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची मागणी केली आहे.

राज्य केंद्राच्या नियमाप्रमाणे 70.30 या प्रमाणात आरटीपीसीआर चाचण्या करीत आहे. मुंबई,पुणे सारख्या शहरांमध्ये दर दशलक्ष साडेतीन ते चार लाख चाचण्या केल्या जात आहेत जे देशात सर्वाधिक आहे, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेक द चेन अभियानाअंतर्गत नव्याने ‘या’ घटकांचा समावेश…

Next Post

मृत्यु रोखण्यासाठी वेळीच उपचार होणे आवश्यक-डॉ अनुपमा बेहरे

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
मृत्यु रोखण्यासाठी वेळीच उपचार होणे आवश्यक-डॉ अनुपमा बेहरे

मृत्यु रोखण्यासाठी वेळीच उपचार होणे आवश्यक-डॉ अनुपमा बेहरे

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us